सरचिटणीस झालेले विनोद तावडे पंकजा मुंडेंबद्दल म्हणाले...

माझ्या जागी ज्याला उमेदवार दिली त्यांचा फॉर्म भरायला पण मी उपस्थित होतो.
सरचिटणीस झालेले विनोद तावडे पंकजा मुंडेंबद्दल म्हणाले...
Pankaja Munde, Vinod Tawdesarkarnama

मुंबई : भाजप नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांची नियुक्ती केली. त्यानंतर तावडे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत नड्डा यांचे आभार मानले.

या वेळी तावडे म्हणाले, अधिक जबाबदारी पक्षाने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सगळ्यांच्या नेत्तृत्वाखाली केंद्र सरकारच्या सगळ्या योजना यशस्वीपणे नागरिकांपर्यंत पोंचवण्याचे काम करणार आहे. केंद्रात राज्याचे ऐकले जात नाही असे नाही पण राज्यातील व्यक्ती हा केंद्रात असल्यावर अनेक गोष्टी प्रखरपणे मार्गी लावता येतात, असेही तावडे म्हणाले.

Pankaja Munde, Vinod Tawde
भाजपच्या प्रस्तावावर आठवडाभरात निर्णय ; महावितरण कार्यालयावरील मोर्चा रद्द

लोकशाहीमध्ये ज्यावेळी जी जबाबदारी येते ती उत्कृष्ट पने पार पाडायची असते. 105 आमदार असूनही चांगला विरोधी पक्ष म्हणून काम भाजप राज्यात काम करत आहे. माझे तिकीट नाकारले त्यावेळीही पाहिले तर त्याआधी मी अनेक खाती उत्तम सांभाळली होती, असेही तावडे यांनी बोलून दाखवले. दिले जाईल ते काम करायचे असा मी आहे, असेही ते म्हणाले. माझ्या जागी ज्याला उमेदवार दिली त्यांचा फॉर्म भरायला पण मी उपस्थित होतो. त्यानंतर आज मला हे पद मिळाले. पंकजा मुंडे या त्यांना दिलेले काम उत्तम करत आहेत. सरचिटणीस असताना तुम्हाला अनेक ठिकाणी काम करायला मिळते. मी मुंबईत राहणारा आहे, मुंबई अध्यक्षपद मी सांभाळले आहे. सगळ्यांसोबत मी मुंबई महापालिकेची जबाबदारी निभावेन, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील माणूस दिल्लीत फार काळ टिकत नाही म्हणतात. पण असे काही नाही, असे तावडे म्हणाले.

Pankaja Munde, Vinod Tawde
पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना संधी मिळेल, वर्षभरात स्कोप आहे

या वेळी भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले, खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होतो आहे. राष्ट्रीय स्तरावर मंत्री म्हणून काम केले. देशातील प्रमुख 10 ते 15 लोकांमधील स्थान मिळाले. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पारिवारिक पद्धतीने चालणार पक्ष नाही, असे म्हणत शेलार यांनी शिवसेनाला टोला लगावला. जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता भाजपमध्ये मोठ्या पदावर जातो ही पक्षाची खासियत, असल्याचेही शेलार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in