पंतप्रधान मोदींचे 'हे' पाच संकल्प आत्‍मसात करण्याचे तावडेंनी केले आवाहन

Narendra Modi|Vinod Tawade : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग नवव्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवला.
Vinod Tawade Latest News
Vinod Tawade Latest NewsSarkarnama

मुंबई : अमृतमहोत्‍सवी स्‍वातंत्र्य दिना (Independence Day) निमित्‍ताने लाल किल्‍यावरुन पंतप्रधानांनी दिलेला संदेश सगळयांनी नक्‍की ऐका, हाच आजच्‍या दिनाचा सर्वांसाठीचा संदेश असून पंतप्रधानांनी सांगितलेले पाच संकल्‍प आत्‍मसात करु या ,असे आवाहन भाजपाचे राष्‍ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी आज केले.

Vinod Tawade Latest News
मुनगंटीवारांच्या 'वंदे मातरम्' बोलण्याच्या घोषणेबाबत अजितदादा सभागृहात प्रश्न विचारणार

भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिम वांद्रे सागरी सेतू जवळ समुद्र किना-या जवळ 100 फुटी राष्‍ट्रध्‍वज उभारला असून आज या तिरंग्याचे ध्‍वजारोहण भाजपाचे राष्‍ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावोळी मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार, नगरसेविका अलका केरकर, स्‍वप्‍ना म्‍हात्रे, हेतल गाला, पोलीस उपायुक्‍त मंजुनाथ शिंगे, सहाय्यक पोलीस उपायुक्‍त गुणाजी सावंत, वरिष्‍ठ पोलीस निरिक्षक राजेश देवरे यांच्‍यासह अॅड प्रतिमा शेलार व ओमकार आणि अन्‍वी विनोद तावडे हे युवा पिढीचे प्रतिनिधीही या कार्यक्रमात हिरहिरीने सहभगी झाले होते. त्‍यांनतर आशिष शेलार यांच्‍या हस्‍ते भाजपाच्‍या मुंबई कार्यालयात ध्‍वजरोहण करण्‍यात आले

Vinod Tawade Latest News
सावंतांना निंबाळकर अन् कैलास पाटलांशी संघर्ष करून आरोग्यसेवेचा शिवधनुष्य पेलावा लागणार

दरम्यान,आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सलग नवव्यांदा लाल किल्ल्याच्या (Red Fort) तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवला. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) यंदा 15 ऑगस्ट रोजी होणारा उत्सव विशेष होता. केंद्र सरकारने यानिमित्त 'हर घर तिरंगा'सह अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात जगभरातील अनेक व्हीआयपी, व्हीव्हीआयपींसह विशेष निमंत्रित आहेत. यावेळी पंतप्रधान मोदीं यांनी आपल्या भाषणात पाच संकल्प सांगितले आणि देशाला संबोधित केले आहे.

पंतप्रधान मोदींचे पाच संकल्प

पहिला संकल्प : आता मोठ्या संकल्पाने देश पुढे जायला हवा. खूप जिद्द घेऊन चालायचे आहे. मोठा संकल्प, विकसित भारत.

दुसरा संकल्प: जर आपल्या मनात अजूनही गुलामगिरीचा एक भाग कोणत्याही कोपऱ्यात असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत पळून जाऊ देऊ नये. शेकडो वर्षे गुलामगिरीत जखडून ठेवलेल्या अवस्थेतून आता शंभर टक्के सुटका करावी लागेल.

तिसरा संकल्प: आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. हा तो वारसा आहे ज्याने एकेकाळी भारताला सुवर्णकाळ दिला. या वारशाचा आपल्याला अभिमान असायला हवा.

चौथा संकल्प: एकता आणि एकता. 130 कोटी देशवासीयांमध्ये एकता. ना स्वतःचा ना कोणी परका. एकतेची शक्ती ही एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नांसाठी आपली चौथी प्रतिज्ञा आहे.

पाचवा संकल्प: नागरिकांचे कर्तव्य. ज्यामध्ये पंतप्रधानही नाबाद आहेत, तर मुख्यमंत्रीही नाबाद आहेत. तेही नागरिक आहेत. येत्या 25 वर्षांची स्वप्ने पूर्ण करणे ही मोठी प्राणशक्ती आहे. जेव्हा स्वप्ने मोठी होतात. जेव्हा विचार मोठे असतात तेव्हा प्रयत्नही खूप मोठे असतात, असे पाच संकल्प सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com