Tanaji Sawant News : 'रूबी हॉल' किडनी रॅकेटप्रकरणाची चौकशी होणार ; आरोग्यमंत्र्यांची घोषणा!

Ruby Hall Kidney Racket : तज्ञ समितीतर्फे निष्पक्ष चौकशी होणार..
Tanaji Sawant News : Ruby Hall Kidney Racket :
Tanaji Sawant News : Ruby Hall Kidney Racket : Sarkaranama

मुंबई : पुणे शहरातील रुबी हॉल रूग्णालयातील किडनी रॅकेटच्या संदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली, चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी जाहीर केली आहे. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षेतेखाली तज्ञ शासकीय व अशासकी डॉक्टरांची समिती स्थापन करून, समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे, सावंत यांनी स्पष्ट केले.

Tanaji Sawant News : Ruby Hall Kidney Racket :
Devendra Fadnavis News: 'पुणेकरांची मिळकत करातील ४० टक्के सवलत कायम ठेवावी’; पुणे भाजप शिष्टमंडळाची मागणी!

भाजपचे आमदार राम सातपुते यांनी रूबी हॉल रूग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. रुबी रूग्णालयाने दलालांमार्फत कोल्हापूरमधील धुणी भांड्याचे काम करूण उदरनिर्वाह करणाऱ्या गरिब महिलेची किडनी काढून विकण्याचा धक्कादायक व गंभीर प्रकार उघडकीस आला होता. हे किडनी प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकारने रूबी रूग्णालयात अवयव प्रत्यारोपण परवाना रद्द केला गेला होता.

Tanaji Sawant News : Ruby Hall Kidney Racket :
Devendra Fadnavis News: 'पुणेकरांची मिळकत करातील ४० टक्के सवलत कायम ठेवावी’; पुणे भाजप शिष्टमंडळाची मागणी!

रुबी रूग्णालयाच्या मालकासह डॉक्टर व संबंधित दलालावर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत (मोका) गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सातपुते यांनी केली. यावर आता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ शासकीय व अशासकीय डॉक्टरांची समिती स्थापन करून, समितीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com