Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

तेरावा खासदार ठाकरेंची साथ सोडणार?

खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाल्याने चर्चा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) मोठी फुट पडली आहे. शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्याच बरोबर पक्ष संघटनेतील अनेकांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. अशातच आता गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांच्या रुपाने आणखी एक खासदार ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

खासदार गजानन किर्तीकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. किर्तीकर रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी गणपती दर्शनाला गेले होते, अशी माहिती आहे. गणपती दर्शनासह भेटीत राजकीय चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे. याच भेटीनंतर किर्तीकर शिंदे गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Maha vikas aaghadi : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता : कॉंग्रेस काय करणार ?

किर्तीकर शिंदे गटात गेल्यास हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरेल. तेरावा खासदार शिंदे गटात गेल्यास त्यांची लोकसभेत ताकद वाढेल, ज्याचा फायदा निवडणूक आयोगसमोरील सुनावणीमध्ये होऊ शकतो. शिवसेनेची स्थानीय लोकाधिकार समिती देखील किर्तीकर यांच्या सोबत फुटू शकते. स्वतः किर्तीकर या समितीचे अध्यक्ष आहेत.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
केंद्रीय पातळीवर नवीन समिकरणांची नांदी; नितीशकुमारांनी घेतली केजरीवालांची भेट

या आधीही एकनाथ शिंदे आणि गजानन किर्तीकर यांची भेट झाली होती. किर्तीकर आजारी असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे सांगितले जात होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी सध्या थेट शिवसेनेवरच दावा सांगितला आहे. सध्या शिंदे सरकारवर न्यायालयाची टांगती तलवार आहे. तसेच निवडणूक आयोगानेही ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. शिंदे यांना शिवसेनेवर दावा सिद्ध करण्यासाठी पक्षातील नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आवश्यक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com