Accident | विनायक मेटेंच्या घातपाताचा संशय; ड्रायव्हरची होणार चौकशी

Mumbai Police| Vinayak Mate Accident| विनायक मेटे यांच्या अपघातानंतर चहुबाजूंनी त्यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
Vinayak Mate Accident
Vinayak Mate Accident

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज पहाटे साडेसहाच्या सुमारास अपघाती निधन झालं. त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विनायक मेटे यांच्या अपघातानंतर (Accident) चहुबाजूंनी त्यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मेटे यांचा नक्की अपघात झाला की तो घातपात होता, अशी शंका त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

या मागणीनंतर आता पोलीसही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या अपघाताप्रकरणी रसायनी पोलीस विनायक मेटे यांचे कारचालक एकनाथ कदम यांची चौकशी करणार आहेत. त्यासाठीची प्रक्रियाही सुरु झाली आहे. रसायना पोलीस एकनाथ कदम याचा जबाब नोंदवून घेणार असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपघाताचा तपशील पडताळून पाहणार आहेत. तसेच हायवेवरील सर्व सीसीटिव्ही फुटेजही चेक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Vinayak Mate Accident
डोक्याला मार, डोळ्यांची हालचाल नाही...अशी होती हॉस्पिटलमध्ये आणल्यावर मेटेंची अवस्था

विनायक मेटे यांचे ड्रायव्हर एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. या अपघातात कदम यांना किरकोळ मार लागला आहे. या अपघाताची हकीकत कदम यांनी सांगितली. 'आम्ही बीडहून आम्ही मुंबईकडे येताना एका ट्रकने आमच्या गाडीला कट मारला. अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. मदतीसाठी 100 नंबरला आम्ही फोन केला, मात्र त्यांनीही फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो पण कोणीही मदतीसाठी गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो, आम्ही गाड्यांना मदतीसाठी विनंती केली. शेवटी एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा माझ्याशी बोलत होते,'' असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं.

दरम्यान,विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठी क्रांती मोर्चाने त्यांचा अपघात झाला की हा घातपात होता, असा संशयही व्यक्त केला जात आहे. तसेच, त्यांच्या या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणीही मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील रसायनी पोलिसांना मेटेंच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आठ जणांचे पथक नियुक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com