Sudhir Mungantiwar: आमदारांच्या तक्रारीनंतर वनअधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती; मुनगंटीवारांनी घेतली तक्रारीची दखल

BJP News: भाजपच्याच चार आमदारांनी केली होती तक्रार
Sudhir Mungantiwar:
Sudhir Mungantiwar:Sarkarnama

Mumbai : वनविभागातील जवळपास 200 अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सत्ताधारी भाजपच्या आमदारांकडून करण्यात आल्याने या आमदारांच्या तक्रारीची दखल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे.

यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी या बदल्यांना तात्काळ स्थगिती दिली आहे. त्याबरोबरच तक्रारी आलेल्या बदल्यांची तपासणी करूनच पुन्हा बदल्या केल्या जातील, असं आश्वासनही मुनगंटीवार यांनी दिलं आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एस.पी.राव आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमीता बिश्वास यांच्याकडून या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये शेकडो वनसंरक्षक, वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचा समावेश होता.

या बदल्यासंदर्भात अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर, अॅड.आशिष जयस्वाल (रामटेक), संदीप धुर्वे (आर्णी) आणि राम सातपुते (माळशिरस) या भाजपच्या आमदारांनी आक्षेप घेतला होता. तसेच याबाबत मुनगंटीवार यांना पत्र पाठवून या प्रकाराकडे लक्ष वेधले होते.

Sudhir Mungantiwar:
Prakash Ambedkar: भावी मुख्यमंत्री असलेले सारेच चौकशीच्या फेऱ्यात; प्रकाश आंबेडकरांनी काढला चिमटा !

या बदल्या करताना गुणवत्तेच्या आधारे न करता चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्या. तसेच बदली करण्याच्या धोरणामध्ये मनमानी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. वरिष्ठांच्या दबावामुळे अनेक अधिकारी बोलत नाहीत. मात्र, यामधून अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी बदली आदेशास स्थगिती देण्याची मागणी आमदारांकडून करण्यात आली होती.

त्यानंतर प्रधान सचिवांच्या दालनात प्रधान मुख्य वनसंरक्षक वाय.एस.पी.राव आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमीता बिश्वास यांची संयुक्त बैठक पार पडली. या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शंका असेल तर कारवाई होणार, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

Sudhir Mungantiwar:
Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारावरून बच्चू कडूंनी काढली 'कारल्याच्या कविते'ची आठवण; म्हणाले...

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

"बदल्यांसंदर्भातील अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. बदल्या या गुणवत्तेच्या आधारावर तुम्ही तुमच्या स्तरावर पारदर्शक पद्धतीने करा, असे मी आदेश दिलेले आहेत. आर्थिक देवाणघेवाणीची चर्चा नव्हती. यामध्ये काही आमदारांनी अधिकाऱ्यांविषयी गंभीर तक्रारी केल्या आहेत म्हणून मी माझ्या विभागाला सूचना केली, त्याची सगळी माहिती घेऊन चौकशी करा. कुठेही शंका असेल तर कारवाई करा, अशा सूचना दिल्या आहेत, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

Edited By-Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com