Crime News : 'मला बोअर होतंय, गाणं म्हणून दाखव,' म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन!

Crime News Mumbai : उपसंचालक महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना.
Crime News
Crime NewsSarkarnama

मुंबई : मंत्रालयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अवर सचिवांच्या कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या उपसंचालक महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली समोर आली होती. मंत्रालयात झालेल्या या अनुचित प्रकाराबाबत विभागाच्या संबंधित मंत्र्यांनी त्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती मिळत आहे.

महिला अधिकारी कार्यालयात गेलेल्या असताना, 'मला बरे वाटत नाही, मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव,' असे त्यांना सबंधित अधिकाऱ्याने सांगितले. अशा पद्धतीचं हीन वक्तव्य एका मंत्र्यांच्या अवर सचिवानी केले आहे. याच ठिकाणी या विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती.

Crime News
Bachchu Kadu : युती करायला कोणीही चालेल का? तुमची तत्वे कुठे गेली? बच्चू कडू म्हणाले..

18 ऑक्टोबर 2022 च्या या घटनेमध्ये संबंधित महिलेनेच या दोन अधिकाऱ्यांची लेखी तक्रारीचा अर्ज संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे दिलेला होता. मात्र याबाबत त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाला नाही, असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हंटले होते. यानंतर आता या अनुचित प्रकाराबाबत विभागाच्या संबंधित मंत्र्यांनी दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याचे कळत आहे. ही कारवाई स्वागतार्ह आहे, परंतु याबाबतचे शासकीय परिपत्रक समोर येईपर्यंत आणि कारवाई पूर्ण होईपर्यंत यावर लक्ष असेल, असे निलम गोऱ्हे यांनी म्हंटले आहे.

तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही याबाबत पाठपुरावा करून कारवाईसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. मंत्री अतुल सावे यांच्याशी दूरध्वनीवर आपलं सविस्तर बोलणं झाल्यानंतर, याबाबत चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. हे शिंदे - फडणवीसांचं सरकार आहे, महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही वाघ म्हणाले.

Crime News
Aditya Thackeray : 'टाटा'नंतर आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर, ठाकरेंचा सरकारवर निशाणा!

मंत्रालयात झालेल्या या अनुचित प्रकाराबाबत विभागाच्या संबंधित मंत्र्यांनी त्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती असली, तरी त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. याबाबात जूनही अधिकृत पत्र जाहीर झालेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in