परमबीरसिंहासह २५ अधिकाऱ्यांना घरी बसावे लागणार ; निलंबनाचा प्रस्ताव

ज्यांच्यावर गुन्हाची नोंद आहे, अशा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी सरकारला केली आहे.
Sanjay Pandey,Parambir Singh
Sanjay Pandey,Parambir Singhsarkarnama

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि अन्य पोलिस ज्यांच्यावर गुन्हाची नोंद आहे, अशा अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी, राज्याचे डीजीपी संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी राज्य सरकारला केली आहे. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी गृहविभागाला पाठविला आहे. त्यांना निंलबित करण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे.

संजय पांडे यांनी दिलेल्या प्रस्तावात पंचवीसहून अधिक पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत, यात परमबीर सिंह, चार डीसीपी दर्जाचे अधिकारी आहेत. तसेच विविध प्रकरणात आरोपी असलेले एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नावे यात आहेत. संबधित गुन्ह्यामध्ये या पोलिस अधिकाऱ्यांची नेमकी काय भूमिका होती, याबाबतचा तपशील महाराष्ट्र पोलिसांकडे मागविण्यात आला आहे. पोलिस महासंचालकांनी आरोप असलेल्या या अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांचावरील कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी सांगितली.

Sanjay Pandey,Parambir Singh
आरोग्यमंत्री टोपेंनी मागितली माफी ; 'न्यासा'वर फोडलं खापर

पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारीच्या आधारे अकोला पोलिसांनी परमबीर सिंह आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. यानंतर 23 जुलै रोजी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. दुसऱ्या दिवशी कोपरी पोलिसांनी दुसरा गुन्हा नोंदविला आहे. मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी परमबीर सिंह यांची चौकशी करण्याची जबाबदारी राज्य सरकारने संजय पांडे यांच्याकडे सोपवली होती.

Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com