शिंदे गटातील आमदार ठाकरेंच्या संपर्कात; सुषमा अंधारेंनी थेट नावच सांगितले

Sushma Andhare News : शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड करून ४० आमदार बाहेर पडले आहेत.
CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|
CM Eknath Shinde| Uddhav Thackeray| sarkarnama

Sushma Andhare News : शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड करून ४० आमदार बाहेर पडले आहेत. त्यांनी भाजपसोबत जात सरकार स्थापन केले आहे. मात्र, अनेक जणांना मंत्रीपदे मिळालेली नाहीत. त्यामुळे आमदार नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संपर्कात आमदार असल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.

सुषमा अंधारे म्हणाल्या, शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात आहेत. आम्ही अजूनही परतीचे दोर कापलेले नाहीत, असा दावा त्यांनी केला. अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सध्या राज्यभरात सुरु आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अंधारे म्हणाल्या, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत.

CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|
Chitra Wagh News : चित्रा वाघ यांच्याकडे भाजपने दिली मोठी जबाबदारी

आम्ही टीका करताना कधीच पातळी सोडणार नाही. परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नाहीत. असे सूचक विधान अंधारे यांनी केले. तसेच हिंदुत्वावर भूमिका मांडताना त्या म्हणाल्या, मला सर्व धर्माबाबत आदर आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमधील परिषदेत हिंदुत्व सांगितले आहे. ते महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

शिंदे गटातील काही आमदार नाराज आहेत. काहीजन आमच्या संपर्कात असल्याचेही अंधारे यांनी सांगितले. शिंदे गटात असलेले आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात आहेत. शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ आहेत. शिरसाट यांना पश्चाताप होत आहे, असा दावा अंधारे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

CM Eknath Shinde| Uddhav Thackeray|
राष्ट्रवादीला मोठा धक्का : चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचा तडकाफडकी राजीनामा

आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर बोलताना अंधारे म्हणाल्या, आमदार बच्चू कडू हे लढाऊ आणि स्वाभिमानी आहेत. त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. रवी राणा हे उथळ व्यक्तिमत्त्वाचे आहेत. चर्चेत राहण्यासाठी ते सतत काहीतरी बोलत असतात, असा हल्लाबोल त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com