Sanjay Raut : टायगर इज कम बॅक ! ; सुषमा अंधारेंचे टि्वट, ठाकरे गटाकडून जल्लोष

Sushma Andhare : राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सुषमा अंधारेंना अश्रू अनावर झाले.
sanjay raut
sanjay rautsarkarnama

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची शंभर दिवसानंतर जेलमधून सुटका होणार आहे, त्यांना जामीन मिळाला आहे. राऊतांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांनी टि्वट करीत राऊतांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे. (sanjay raut granted bail news update)

अंधारे यांनी टि्वट करीत राऊतांच्या जामीनावर आनंद व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अंधारेंना अश्रू अनावर झाले.

"टायगर इज कम बॅक," असे टि्वट सुषमा अंधारेंनी केलं आहे. राऊतांच्या जामीनाना ईडीनं विरोध केला आहे, यावर तीन वाजता सुनावणी होणार आहे. ईडी या निर्णयाविरोधात उच्चन्यायालयात जाणार असल्याची शक्यता आहे.

sanjay raut
Bharat Jodo Yatra : सुरक्षा भेदत बांधावर सरसर चढत राहुल गांधींनी युवकांशी साधला संवाद..

संजय राऊत गेल्या १०२ दिवसांपासून कोठडीत आहेत. आज त्यांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटाने जल्लोष केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ बाहेर येऊन पुन्हा धडाडणार, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे.

sanjay raut
मोठी बातमी : Sanjay Raut शंभर दिवसानंतर कारागृहातून बाहेर येणार ; जामीन मंजूर

ता. 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरपासून संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहात होते. राऊतांना पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडी झाली. तेव्हा पासून राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत.

राऊत यांना जामीन मिळाला असला तरी आज (बुधवार) संध्याकाळपर्यंत न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळणार आहे. त्यानंतर राऊत यांना तुरुंगाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com