Sanjay Shirsat News: विनयभंग प्रकरणी शिवसेना आमदाराला क्लीन चीट ; सुषमा अंधारेंनी...

Sanjay Shirsat Vs Sushma Andhare : एका जाहीर सभेतत शिरसाट यांनी अंधारे यांच्यावर अंत्यत खालच्या भाषेत टिका केली होती.
Sanjay Shirsat vs Sushma Andhare
Sanjay Shirsat vs Sushma AndhareSarkarnama

Sushma Andhare File Defamation Case : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

याप्रकरणी सुषमा अंधारेंनी शिरसाटांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून शिरसाट यांनी क्लीन चीट मिळाली आहे.

Sanjay Shirsat vs Sushma Andhare
Ahilyadevi Holkar Jayanti : अहिल्यादेवी होळकर जयंतीवरुन रोहित पवार-राम शिंदे आमने सामने ; पवारांनी मध्यरात्रीच..

मेळाव्यात संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होते. याप्रकरणी महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. "व्यक्ती समोर नसल्यामुळे विनयभंग होत नाही," असा दावा छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे एका जाहीर सभेतत शिरसाट यांनी अंधारे यांच्यावर अंत्यत खालच्या भाषेत टिका केली होती. हे प्रकरण अंगलट येईल असे लक्षात येताच त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देत सारवासारव केली होती.

Sanjay Shirsat vs Sushma Andhare
Maharashtra Govt : फडणवीस 'सुपर सीएम’ टीकेला शिंदेंनी दिलं उत्तर ; 11 महिन्यात शिंदेंची सरशी

सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात सुषमा अंधारे यांनी शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

काय प्रकरण आहे..

काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारेंवर टीका करत असताना संजय शिरसाट यांनी खालच्या पातळीचे वक्तव्य केलं होते. शिरसाट म्हणाले होते की, “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत.” या वक्तव्या विरोधात सुषमा अंधारे यांनी दावा ठोकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com