'प्रकरण अगदी वाया गेलेलं आहे.. हे तर भोंदू हृदयसम्राट' : भाजप नेत्याची खोचक टीका

Uddhav Thackeray : माझ्या उद्धवला सांभाळून घ्या, असे बाळासाहेब का म्हणायचे...
Uddhav Thackeray Atul Bhatkhalkar
Uddhav Thackeray Atul BhatkhalkarSarkarnama

मुंबई : देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसेचे रक्तरंजित कपडे आजही जपून ठेवले. अस्थीही जपून ठेवल्या जातात. जयंती, पुण्यतिथीच्या माध्यमातून दरवर्षी गांधींच्या फोटोला पुन्हा गोळ्या मारल्या जातात. हे तुमचं हिंदुत्व आहे का? याकूब मेननच्या कबरीचं काय करायचं ते केरायला पाहिजे. त्याचं समर्थन कोणीच करत नाही. त्याची चौकशीही झाली पाहिजे. मात्र नथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्यांचे काय? हा प्रश्न संघ, भाजपला (BJP) विचारायला पाहिजे, असा सवाल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. (Yakub Menon Grave Latest News)

Uddhav Thackeray Atul Bhatkhalkar
मतभेद विसरुन आदित्य ठाकरे अन् चंद्रकात पाटील बनले बाप्पाच्या पालखीचे भोई!

यावर आता भाजपकडूनही प्रतिक्रिया आली असून भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनीही पलटवार करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की "माझ्या उद्धवला सांभाळून घ्या, असे बाळासाहेब का म्हणायचे हे लोकांच्या पुरते लक्षात आलं आहे. प्रकरण अगदीच वाया गेलेलं आहे...हे तर भोंदू हृदयसम्राट, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

Uddhav Thackeray Atul Bhatkhalkar
दसरा मेळावा शिवसेनेचा की शिंदे गटाचा? अजित पवार म्हणाले...

सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या की, याकूब मेननच्या कबरीवर फुले चढवणे, सजावट करणे हे वाईटच. त्याचे समर्थन कुणीच करु शकत नाही. मात्र याकूबची फाशी आणि त्यावरील अंमलबजावणी भाजप काळात झाल्याचा दावा त्यांनी केला. जर अमेरिकन सरकार लादेनचा मृतदेह समुद्रात टाकतं तर अशीच कृती याकूब मेननच्या बाबतीत तुम्हाला का सुचली नाही? असा सवाल उपस्थित करत मूळात मृतदेह दफन करण्याची परवानगीच का दिली, असा सवालही त्यांनी भाजपला विचारला आहे.

दरम्यान, याकूब मेमच्या कबरीवरून महाविकास आघीडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहेत. दरम्यान आगामी पालिका निवडणुका आल्याने यावरुन अजूनच राजकीय वातावरण अजूनच तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com