Sushama Andhare : नितू-निलू आमचे भाचे आगाऊ लेकरं..; अंधारेंनी उडवली राणे पिता-पुत्रांची खिल्ली

Sushama Andhare : आमच्या भावाचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालयं,"
Sushama Andhare latest news
Sushama Andhare latest newssarkarnama

Sushama Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी काही दिवसापूर्वी टि्वट केला होता. यात त्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागले होते. त्याला अंधारे यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले आहे. त्या माध्यमांशी बोलत होते. (Sushama Andhare latest news)

"आमचा नितू- निलू हे दोन्ही भाचे हे दोन्ही प्रचंड आगाऊ लेकरं आहेत.त्यांचा अभ्यास कच्चा आहे. आमची अडचण अशी आहे की त्यांना वळण लावण्यात, आणि संस्कार करण्यात आमच्या भावाचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालयं," असा टोल अंधारेंनी राणे पिता-पुत्रांना लगावला आहे.

Sushama Andhare latest news
Sanjay Raut : महाराष्ट्राला नामर्द बनविण्याचे भाजपचं कारस्थान ; राऊतांचा हल्लाबोल

नितेश राणे यांनी टि्वट केलेल्या त्या व्हिडिओ अंधारेंनी समाचार घेतला. "त्यांना हे कळलं पाहिजे की त्यांनी टि्वट केलला व्हिडिओ वीस वर्षापूर्वीचा केंद्रीय महोत्सवातील आहे. त्यातील माझी चेहेरे पट्टी कशी आहे, ते त्यांनी पाहावं, तो खंडण-मंडण मुद्यांचा व्हिडिओ आहे, तो त्यांनी ओढून-ताणून आणला आहे," असे अंधारे म्हणाल्या.

"वाद-विवादात एक बाजू खंडणाची एक बाजू मंडणाची आहे. त्यांचा काही भाग ओढून आमचा नितू दाखवत असेल तर मी समजू शकते. कारण कणकवली जाऊन मी त्यांचा होमवर्क घेतला आहे, त्यामुळे त्याची कानशीलं लाल झालेली आहेत. त्यामुळे अशा काळात त्यांचे असे बोलणं अस्थिर होणं स्वाभाविक आहे," अशी टीका त्यांची केली .

Sushama Andhare latest news
Gujarat Election 2022 : बंडखोरांनी वाढवलं टेन्शन ; निवडणुकीत भाजपचा खेळ बिघडविणार ?

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर “हिंदुह्रदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन? अरे किती ती सत्तेसाठी लाचारी! सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी?” असं ट्विट करत त्यांनी सुषमा अंधारेंचा एक व्हिडिओ काही दिवसापूर्वी शेअर केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com