रामदास कदम महागद्दार; सुर्यकांत दळवींचा पलटवार

सुर्यकांत दळवी (Surykant Dalavi) यांनी रामदास कदमांच्या (Ramdas Kadam) आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे
Suryakant Dalavi 

Suryakant Dalavi 

Sarkarnama 

रत्नागिरी : शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. या आरोपांना रत्नागिरीचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास कदमांचे रणनिती हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.

''रामदास कदम हेच शिवसेनेचे महागद्दार आहेत. सध्याचे केंद्रीय मंत्री आणि तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे २००४ मध्ये जेव्हा शिवसेना सोडणार होते, तेव्हा रामदास कदम हे देखील शिवसेने सोडायला निघाले होते. नारायण राणे पक्ष सोडून गेले त्यावेळेला शिवसेनेच्या आमदारांना घेऊन पक्ष सोडण्याची भूमिका याच रामदास कदम यांनी बजावली होती.

<div class="paragraphs"><p>Suryakant Dalavi&nbsp;</p></div>
सुनील तटकरेंमुळे महाविकास आघाडीला तडे? : सलग तीन सेना आमदारांची टीका

तसेच, रामदास कदम यांच्या ऑडिओ क्लिप त्यांनी कोर्टात जाऊन खोट्या आहेत हे सिद्ध करून दाखवावे. अनिल परबांवर आरोप करुन त्यांनी ते पुन्हा रत्नागिरीत त्यांचा मनमानी कारभार करतील, असं त्यांना वाटत असेल तर तसं होणार नाही, असही सुर्यकांत दळवी यांनी म्हटलं आहे.

2014 मध्ये मला पाडण्याचे काम रामदास कदम यांनी केलं. लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्याविरोधात कपबशीचा प्रचार सुद्धा कदम यांनीच केला. पक्षाच्या स्थानिक उमेदवारांना अधिकृत उमेदवारांना संपविण्याचे काम वारंवार रामदास कदम यांनी केला असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.

रत्नागिरीला पर्यटनाच्या दृष्टीने वेगळ महत्व प्राप्त होत चाललं आहे. पण रामदास कदम यालाही खिळ घालण्याचं काम करत आहेत. स्वार्थासाठी कदम कोणतीही भूमिका घेऊ शकतो, पण शेवटी विजय सत्याचाच होत असतो. नियती कोणाला सोडत नाही, असे म्हणत सुर्यकांत दळवी यांनी रामदास कदमांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com