Sureshdada Jain News : आपले राजकीय वारसदार कोण? सुरेशदादा जैन यांनी थेट नावचं सांगितलं...

सुरेशदादा जैन पुन्हा राजकारणात सक्रीय होणार की नाही याबाबत राज्यभरात चर्चा सुरु आहे.
Sureshdada Jain News
Sureshdada Jain News

Sureshdada Jain News : सुरेशदादा जैन यांनी आपण सद्यःस्थितीत राजकारणात सक्रिय न होण्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यासोबतच आपले राजकीय वारसदार म्हणून उद्योगपती अशोक जैन सक्षम असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता अशोक जैन राजकारणात येणार काय? याबाबत चर्चा सुरू आहे.

घरकुल गैरव्यवहार प्रकरणात नियमित जामीन मिळाल्यानंतर तब्बल साडेतीन वर्षांनंतर माजी मंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरेशदादा जैन बुधवारी (ता. १४) जळगावात दाखल झाले. त्यांचे मोठ्या जल्लोषात येथे स्वागत करण्यात आले.

Sureshdada Jain News
Arun Gawali news : अरुण गवळी यांना संचित रजा मंजूर

अशोक जैन योग्य उमेदवार

शिवाजीनगरमधील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सुरेशदादा जैन त्यांनी आपल्याला राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले. आपण मार्गदर्शक म्हणून राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या वेळी आपले राजकीय वारसदार म्हणून जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी असावे, अशी इच्छा व्यक्त केली. याबाबत बोलताना ते म्हणाले, की माझ्या डोळ्यासमोर आज पहिल्या क्रमांकाचा सक्षम उमेदवार म्हणून अशोक जैन आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी राजकारणात यावे, हे मी पहिल्यापासून बोलत आहे. भवरलालभाऊ असतानाही आपण हेच सांगितले होते. अशोक जैन यांना राजकाणात पुढे करावे, अशी आपली इच्छा होती. मात्र, भाऊंची त्या वेळी इच्छा नव्हती. आज अशोक जैन यांचीही जबाबदारी वाढली आहे. तरीही बघू या पुढे काय होते ते. मात्र, आज जे काही माझ्या डोळ्यासमोर आहे, या शब्दांत त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. येत्या काही दिवसांत काय निर्णय होतो ते पाहू या, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

मेंटॉर म्हणून राहणार

गेल्या काही वर्षांत शहराची दुरवस्था झाल्याची खंत व्यक्त करत शहराच्या भल्यासाठी कुणी सल्ला मागितला, मार्गदर्शन मागितले, तर आपण ते प्रत्येकाला देऊ. एका मेंटॉरच्या भूमिकेत आपण कायम राहू, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com