Raj Thackeray : मुख्यमंत्री होण्याची सुरेश जैनांची संधी अशी हुकली; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा !

Raj Thackeray : विधानभवनात झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी किस्सा सांगितला...
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama

Raj Thackeray : १९९९ साली सुरेश जैन यांची मुख्यमंत्री होण्याची संधी कशी हुकली, याबाबतचा किस्सा राज ठाकरे यांनी आज सांगितला आहे. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला.

राज ठाकरे म्हणाले की, ''१९९९ साली शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरु होती. यावेळी शिवसेना- भाजप युतीचे सरकार आणण्यासाठी हालचाली सुरू होत्या. यासाठी आमदारांची खेचाखेची देखील सुरु होती. मात्र, काही कारणास्तव शिवसेना-भाजपची युती मुख्यमंत्री पदावर अडकत होती. काही गोष्टी होत्या त्यावर सह्या होत नव्हत्या. त्यामुळे युती होत नव्हती''.

Raj Thackeray
Marathwada News : डबल इंजिन सरकारचे अर्थमंत्री फडणवीस मराठवाड्याला पावणार का ?

''पण त्यानंतर मातोश्रीवर भाजपचे प्रकाश जावडेकर आणि भाजपचे इतर काही नेते आले. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भेटण्याचा आग्रह धरला. पण बाळासाहेब झोपलेले होते. पण तरी देखील बाळासाहेबांना निरोप देण्याचा आग्रह प्रकाश जावडेकर यांनी धरला. त्यानंतर मी (राज ठाकरे) बाळासाहेबांना त्यांचा निरोप पोहोचवला''.

''मुख्यमंत्री पदावरुन भाजप-सेनेत चर्चा सुरू होती. याचेवेळी भाजपकडून सुरेश जैन मुख्यमंत्री होतील, असा निरोप प्रकाश जावडेकर यांनी दिला आहे, असं बाळासाहेबांना सांगितलं'', असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Narayan Rane : पात्र नसतानाही शिवसेनेचा सदस्य कसा झालो; स्वत: राणेंनींच सांगितला किस्सा!

''यावर बाळासाहेबांनी सांगितलं की, मुख्यमंत्री होईल तर मराठी माणूसच... असं त्यांना सांगण्यास राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सांगितलं''. हाच किस्सा राज ठाकरे यांनी आज विधानभवनात झालेल्या कार्यक्रमात सांगितला आहे. त्यामुळे १९९९ साली सुरेश जैन (Suresh Jain) यांची मुख्यमंत्री होण्याची संधी कशी हुकली हे समोर आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in