Supriya Sule News : सुप्रिया सुळेंनी करून दिली फडणवीसांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण

Supriya Sule News : सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांचे दोन व्हिडिओ ट्विट केले...
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Supriya Sule News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेबाहेर असताना आणि आता सत्तेत असताना दोन वेगळ्या भूमिका घेतल्या आहेत, असं ट्विट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना आपल्या जुन्या एका वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. त्यामध्ये कृषीपंपाच्या वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी यू-टर्न घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सध्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू झाल्यामुळे शेतकरी आपल्या पिकाला पाणी भरण्यासाठी कृषीपंपाचा (Krushi Pump) वापर करतात. सध्या राज्य सरकारने अर्थात महावितरणने कृषीपंपांच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत.

याच मुद्यावरून देवेंद्र फडणवीसांनी सत्तेबाहेर असताना वीजबील वसूलीला विरोध करत'मध्य प्रदेश पॅटर्न'चे कौतुक केले होते. आता ते सत्तेत आले आहेत तर त्यांनी देखील राज्यात मध्यप्रदेश पॅटर्न राबवावा, अशी मागणी करत फडणवीसांना त्यांच्या वक्तव्याची सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आठवण करून दिली आहे.

Supriya Sule
Ajit Pawar : गुजरातवरून अजितदादांनी शिंदे-फडणवीसांना पुन्हा घेरले...

काय आहे सुप्रिया सुळे यांचं ट्विट? :

"विरोधात असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करत वीजबील वसूलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे अर्थखाते देखील आहे.त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती. हा यू टर्न आता चालणार नाही." असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांचे दोन व्हिडिओ ट्विट केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com