Supriya Sule News: काँग्रेस प्रणित सरकार सत्तेत आल्यावर गडकरींचं मंत्री पद कायम ठेवणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Political News: नितीन गडकरी हे एक चांगले मंत्री...
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांच्या विकासकामांची भुरळ सत्ताधार्यांसह विरोधीपक्षांना देखील पडत असते. म्हणूनच विरोधी पक्षातील नेतेमंडळींकडून गडकरींवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत असतो. याचदरम्यान आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री नितीन गडकरींबाबत मोठं विधान केलं असून राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत दिली. यावेळी सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले आहेत. सुळे यांच्या गडकरींविषयी केलेल्या विधानावर राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

Supriya Sule
Politics : ''...त्यांचं तैलचित्र लावताना कशाचं डोंबलाचं राजकारण करता!''; शिंदे गटाच्या नेत्यानं ठाकरेंना सुनावलं

भविष्यात केंद्रात काँग्रेस प्रणित सरकार आल्यानंतरही नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय मंत्री पद ठेवायला हवं, असं विधान मुलाखतकारानं सुप्रिया सुळे यांच्यासमोरच केलं. तसेच त्यांनी अमेरिकेतही ओबामा यांनी बुश सरकारमधील संरक्षण मंत्री बदलले नव्हते असा संदर्भही दिला. या सूचनावजा प्रश्नावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विचार करु असं उत्तर दिले.

यावर खासदार सुळे म्हणाल्या, ही नितीन गडकरींसाठी सर्वात उत्तम कॉम्प्लिमेंट आहे. मी त्यांच्याशी बोलून त्यांना विचारेन, खरंच हे शक्य आहे का‌.? नितीन गडकरी हे एक चांगले मंत्री असून त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे असंही सुळे यांनी सांगितले.

Supriya Sule
MNS : ...म्हणून राजकीय पक्ष काढणं शक्य झालं; राज ठाकरेंनी सांगितली पक्ष काढण्यामागची प्रेरणा

पण याचवेळी सुळे यांनी भाजपवर निशाणा साधताना भाजपचे बरेच नेते फेकतात. त्यांच्याकडून सतत 70 वर्षात काय केलं असा प्रश्न विचारला जातो. मात्र हे सगळे याच काळात बनलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिकलेत. या गोष्टी त्या विसरतात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

बारामतीत इतकी वर्ष पवार कुटुंबाचा राजकीय दबदबा कायम राहण्यामागचं गुपितही सुळे यांनी या मुलाखतीत उलगडलं आहे. आमचं कुटुंब म्हणजे हम साथ साथ है सारखं आहे. पवार कुटुंब हे एकसाथ असतं. आम्ही लोकांची सेवा करतो, म्हणून आम्ही 50 वर्षांपासून तिथं टिकून आहोत असं सुळे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in