चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंना अनेकांचा पाठिंबा; सर्वांचे मानले आभार

Supriya Sule| Chandrakant Patil| ओबीसी आरक्षणावरुन दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती.
चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंना अनेकांचा पाठिंबा; सर्वांचे मानले आभार
Supriya Sule latest news updatesarkarnama

Supriya Sule latest news

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. कशाला राजकारणात राहता, घरी जा, स्वयंपाक करा, असं पाटील म्हणाले होते. त्यानंतर राज्यभरातून चंद्रकांत पाटलांवर टीकेची झोड उठली होती.

चंद्रकांत पाटलांवर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर मात्र पाटील यांचा सूर नरमल्याचं दिसून आलं. 'खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य महिलांविषयीही माझ्या मनात कायम आदराचीच भावना आहे,'असं म्हणत त्यांनी सारवासारव केली. या सर्व प्रकरणानंतर आता या प्रकरणावरुन मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी आभार मानलेत. ट्विट करत त्यांनी त्यांच्या समर्थकांचे आभार मानले आहेत.

Supriya Sule latest news update
'राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या त्या नेत्याचा आमच्याशी संबंध नाही'; सरदार तारा सिंग यांच्या मुलाचा खुलासा

''काही दिवसांपूर्वी माझ्यावर झालेल्या टीकेनंतर माझ्यासाठी ट्विट करणाऱ्या मला फोन करुन पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. पुढारलेल्या विचारांचा सक्षम देश घडवण्याच्या दृष्टीने तुम्ही लैंगिक सामनेसाठी दिलेल्या समर्थनार्थ तुमचे आभार,'' असं ट्विट सुप्रिया यांनी केलं आहे.

ओबीसी आरक्षणासाठी भाजपकडून बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली. त्यांच्या या टीकेवर बोलताना पवार म्हणाले, अतिशय चुकीचं वक्तव्य आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुणालाच आवडलं नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांनाही आवडलं नसेल. शांत डोक्याने उत्तरं द्यावीत. आम्हीही खूप काही बोलू शकतो.

सुप्रिया सुळेंवर झालेल्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, 'तुम्ही पाकिस्तानात जा, असं आम्ही म्हणणार नाही. त्यांनी कोल्हापूरात राहावं, पुण्यात राहावं. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर त्यांनी करावा. पण तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे. कुठल्याही समाजाला, घटकाला, महिलांच्या भावना दुखावतील, असं बोलू नये. आमच्याही लोकांनी असं कुणी बोलू नये, असंही पवार म्हणाले.

- सुप्रिया सुळेंच्या कोणत्या वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांनी टोला लागवलेला

मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाचा निकाल लागला. पण दिल्लीत कोणासोबत बैठका झाल्यानंतर मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणाचा निकाल लागला’’, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला होता. दिल्लीत गेल्यावर आपण केंद्र सरकारला याबाबत प्रश्न विचारणार असल्याचेही सुळेंनी म्हटले होते. ओबीसी आरक्षणासंदर्भात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने एकत्र लढण्याचे ठरवले होते. पण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि दोन दिवसांत मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणाचा निकाल लागला. मध्य प्रदेश सरकारने असं काय केले की, त्यांना न्याय मिळाला आणि आपल्यावर अन्याय झाला. याचं उत्तर मी केंद्र सरकारकडे मागणार आहे. मध्य प्रदेश बाबत जो निर्णय झाला तो अंतिम निर्णय नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in