हा तर महाविकास आघाडीचा मोठेपणा; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला

Rajya sabha Elelection 2022| Supriya Sule| राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीने दिलेली ऑफर भाजपने फेटाळून लावली
हा तर महाविकास आघाडीचा मोठेपणा; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला
Rajya sabha Elelection 2022| Supriya Sule|

मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहाव्या जागेवरील आपल्या उमेदवाराला भाजपाने पाठिंबा द्यावा, त्याबदल्यात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) विधानपरिषदेची जागा भाजपासाठी सोडण्यात येईल, असा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आला. मात्र त्याउलट भाजपासाठी राज्यसभेची (Rajya sabha Election) जागा सोडल्यास परिषदेची जागा महाविकास आघाडीला देण्याचा प्रस्ताव भाजप कडून देण्यात आला. दोन्ही बाजूंनी ही अट मान्य न केल्यामुळे कुणीही अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे आता राज्य सभेची ही निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाजपवर निशाणा साधला आहे.

''महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने स्वत:हून देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, हा महाविकास आघाडीच्या मनाचा मोठेपणा आहे, पण आता घोडेबाजारासारख्या गोष्टींची चर्चा होणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणारं आहे. जवळपास दोन दशकांनंतर अशी निवडणूक होत आहे.जे कोणत्याही राज्याच्या राजकारणासाठी हिताचं नाही”, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळेंनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

Rajya sabha Elelection 2022| Supriya Sule|
राज्यभरात मास्क सक्ती नाहीच; पण काही अपवाद

याचवेळी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहूल गांधींना ईडीच्या नोटीशीवरही भाष्य केलं आहे. ''सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीने नोटीस पाठवल्याचं आपल्याला आश्चर्य वाटत नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. “मला यात फार आश्चर्य वाटत नाही. केंद्र सरकार हे सूडाचं राजकारणच करत आहे. ज्या महिलेने इतकी वर्ष देशाची सेवा केली, त्या महिलेला ईडीची नोटीस पाठवणं हे केंद्र सरकारचचं दुर्दैव आहे. भाजपने काहीतरी नवीनच पद्धत सुरू केली आहे”, असं त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडीकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी महाविकास आघाडीकडून भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी, त्याबदल्यात भाजपला विधान परिषदेची एक वाढीव जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, भाजपने ती ऑफर फेटाळून लावत तीच ऑफर महाविकास आघाडीला दिली. त्यामुळे आता राज्य सभेची ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in