नार्वेकरांनी परबांना रोखलं ; हातातील माइक काढून घेतला, अन्..

मंत्रिमंडळात परबांना मोठे महत्त्व आहे. अशा परबांना रोखण्यातही मिलिंद नार्वेकर हे मागेपुढे पाहात नसल्याची चर्चा या कार्यक्रमानंतर रंगली.
Supremos Cup Milind Narvekar
Supremos Cup Milind Narvekarsarkarnama

मुंबई : शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे कोणाला, कधी आणि कसे रोखतील आणि धडा शिकवतील याचा नेम नाही! नार्वेकरांच्या 'वर्किंग स्टाइल'चा अनुभव चक्क परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनाही शनिवारी एका कार्यक्रमात आला. त्याचे निमित्त ठरले, सुप्रीमो चषकाच्या आयोजनातील एका किरकोळ चुकीचे.

या स्पर्धेच्या परितोषिकाच्या यादीत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला बक्षीस नसल्याची संयोजकांची चूक नार्वेकरांनी हेरली आणि त्याचक्षणी समारोपाचे भाषण करण्याच्या तयारीत असलेल्या परब यांच्या हातातील माइक काढून घेतला. त्यापुढे जाऊन नार्वेकरांनी क्षेत्ररक्षकाच्या कामगिरीसाठी स्वत:कडून बक्षिसाची रक्कम जाहीर केली प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा असतानाच नार्वेकरांनी एकाकीच परबांकडचा माइक काढल्याने व्यासपीठावर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

Supremos Cup Milind Narvekar
शिवसेना भवनासमोर भोंग्यावर हनुमान चालिसा ; मनसेनं डिवचलं

दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या सुप्रीमो चषक स्पर्धेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशतर्फे एका कार्यक्रमात आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला परिवहन मंत्री अनिल परब, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, आमदार संजय पोतनीस, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याच्या उद्देशाने केलेल्या नियोजनाची माहिती या साऱ्या मंडळींनी पत्रकारांना दिली. त्यावरच्या पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमारही संपला, मात्र, या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीबद्दलच्या बक्षिसाची यादीही वाचून दाखविली गेली. त्यात उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाजापासून वेगवेगळ्या कामगिरीसाठी प्रोत्साहन म्हणून बक्षिसे होती.

Supremos Cup Milind Narvekar
पवार, राऊतांच्या टीकेला राज ठाकरे देणार 'करारा जबाब' ; मनसेचा टीझर रिलीज

त्यानंतर समारोप म्हणून परब आपली भूमिका मांडणार असल्याचे जाहीर करण्यात आले आणि त्याक्षणी परब यांनी माइकचा ताबा घेतला. परंतु, बक्षिसाच्या या यादीत क्षेत्ररक्षणाचा उल्लेखही नसल्याची बाब नार्वेकरांच्या नजरेतून सुटली नव्हती. त्यात क्षेत्ररक्षकाला प्रोत्साहन का दिले नाही, अशी विचारणा नार्वेकरांनी केली. त्यावर लगेचच निर्णय शक्य नसल्याने हा मुद्दा मागे पडण्याची शक्यता होती. त्याचवेळी परब हे भाषणाला सुरवात करण्याच्या तयारीतच होते. तेव्हा नार्वेकरांनी परबांना थांबवून, या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडुला दोन लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आणि आपल्या हातातला माइक पुन्हा परबांकडे सोपविला परब हे शिवसेनेतील त्यातही पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील नेते मानले जातात.

राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून तर परब यांचे राजकीय वजन वाढले आहे. परिणामी, मातोश्रीपासून वर्षा आणि मंत्रिमंडळातही परबांना मोठे महत्त्व आहे. अशा परबांना रोखण्यातही मिलिंद नार्वेकर हे मागेपुढे पाहात नसल्याची चर्चा या कार्यक्रमानंतर रंगली. राजकारणात विशेषत: शिवसेनेच्या वर्तुळात स्वपक्षीय असो वा विरोधकांचा एकही चेंडू सहजासहजी न सोडता, जबरदस्त 'फिल्डिंग' लावणाऱ्या नार्वेकरांनी मैदानावरच्या 'फिल्डिंग' तेवढ्याच बारकाईने लक्ष असल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com