
Maharashtra Politic's : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेचं सरकार पूर्वरत केलं असतं, असे न्यायालयाने म्हंटले आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.
दरम्यान १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयाचा चेंडू आता विधानसभाध्यक्षांच्या कोर्टात गेल्यामुळे यापुढे विधानसभाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता राहुल विधानसभा अध्यक्षांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.
'आताच्या घडीला, आताच्या क्षणी तुमच्यासाठी शिवसेना राजकीय पक्ष कोण? तुमच्या मते शिवसेना या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं? उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) की एकनाथ शिंदे?' (Eknath Shinde) असा प्रश्न विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना नार्वेकर म्हणाले की, "राजकीय पक्ष म्हणून कोणता गट प्रतिनिधित्व करतं, हे मी तुम्हाला आज सांगू शकत नाही. या संपूर्ण याचिकांवर सुनावणी घेऊन, संपूर्ण वस्तुस्थितीचा धांडोळा घेऊन, पक्षाची घटना अभ्यासून, आपल्याला यावरती निर्णय घ्यावा लागणार आहे."
राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) पुढे म्हणाले, "ज्या काही प्रलंबित याचिका आहेत, त्या दाखल झालेल्या आहेत. ते दाखल झाल्यानंतर आम्ही त्यांना त्यासंदर्भात नोटीशी दिलेल्या आहेत. आता त्यांच्याकडून उत्तरं अपेक्षित आहेत. काही लोकांनी आमच्याकडून वेळ मागून घेतलेली आहे, उत्तर देण्यासाठी. ही प्रक्रिया चालू आहे. आता उर्वरीत प्रक्रियाही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.