OBC आरक्षण मिळणार की नाही ? ; आज 'सुप्रीम' सुनावणी

OBC Reservation Maharashtra : सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे.
OBC reservation
OBC reservationsarkarnama

पुणे : : राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation Maharashtra) आज (सोमवार) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्त्वाची सुनावणी होते आहे.

सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे. (OBC Reservation Maharashtra news update)

राज्यातील 92 नगर परिषदा, 4 नगरपंचायती आणि 271 ग्रामपंचायत निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.

राज्य सरकारने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाच्या शिफारसी सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतर राज्यातला ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, पण निकालाआधी जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होत.

सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर आज काय निकाल देणार? राज्यातील 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही ओबीसींना राजकीय आरक्षण लागू होणार की ओबीसी आरक्षणाशिवायच येथील निवडणुका पार पाडणार? यावर सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.

OBC reservation
Rohit Pawar : कंबोज यांनी 52 कोटी बुडवून जनतेला चुना लावला ; पवारांचा जोरदार पलटवार

सुप्रीम कोर्टाने 20 जुलैला दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील मिळाला. बांठीया आयोगाने मतदार यादीनुसार सर्व्हे रिपोर्ट (जनगणना अहवाल) प्रमाणे इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या 37 टक्के असल्याचं सांगितलं आहे.

बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार न्यायालयाने ओबीसींना 27% राजकीय आरक्षण 20 जुलै रोजी देण्याचे आदेश दिले होते. मात्र, ओबीसींना आरक्षण देताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, ओबीसींची संख्या 50 टक्क्यांहून अधिक होऊ नये, अशी अटही यात नमूद होती.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्याने राजकीय पक्षांनी तयारीही सुरू केली होती. मात्र, पुन्हा 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाल्याने या निवडणुका रखडल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com