Vijay Mallya : मल्ल्याला कोर्टाचा दणका ; 4 महिन्यांचा तुरुंगवास, 2 हजारांचा दंड ठोठावला

विजय मल्ल्याला कोणताही पश्चाताप नसल्यामुळे ही शिक्षा आवश्यक आहे, असे खंडपीठानं आदेशात म्हटलं आहे.
vijay mallya Latest Marathi News, Vijay Mallya scam news updates
vijay mallya Latest Marathi News, Vijay Mallya scam news updatessarkarnama

नवी दिल्ली : कर्जबुडवून देशाबाहेर पळून गेलेला किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या (vijay mallya) याला सुप्रीम कोर्टानं (supreme court) दणका दिला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी विजय मल्ल्याला कोर्टानं ४ महिने तुरुंगवास व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास दोन महिन्याचा अतिरिक्त तुरुंगवास भोगावा लागणार आहे, कोर्टानं दिलेल्या निकालात म्हटलं आहे. (vijay mallya latest news)

येत्या चार आठवड्यांच्या आत व्याजासह 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे 317 कोटी रुपये) परत जमा करण्यास सांगितले. तसे न केल्यास मालमत्ता जप्त केली जाईल, असाही इशारा न्यायालयाने दिला आहे.

न्यायमूर्ती यू यू ललित, न्यायमूर्ती एस रवींद्र भट्ट आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. मल्ल्याला कोणताही पश्चाताप नसल्यामुळे ही शिक्षा आवश्यक आहे, असे न्यायालयाने खंडपीठानं आदेशात म्हटलं आहे.(Vijay Mallya scam news updates)

vijay mallya Latest Marathi News, Vijay Mallya scam news updates
चिंता करू नका, 'साहेबांनी' देलेले 'घड्याळ' आहे आपल्याकडे ; मनसेनं शिवसेनेला डिवचलं

विजय मल्ल्याने परदेशी खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याबाबतची चुकीची माहिती न्यायालयाला दिली. त्याने पाच वर्षांपासून न्यायालयात हजर न राहून न्यायालयाचा अवमान केला आहे. मल्ल्याला 9 मे 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

डिएगो डीलचे $40 दशलक्ष आपल्या मुलांच्या परदेशी खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याबद्दल आणि मालमत्तेचे अचूक तपशील प्रदान करण्यात अयशस्वी ठरल्याप्रकरणी मल्ल्याला न्यायालयानं दोषी ठरविलं आहे.

  • मल्ल्या यांच्याविरोधात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या एका संघाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

  • मल्ल्याने 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाच्या परतफेडीच्या न्यायालयाच्या आदेशांचे पालन केले नाही, असे बँकांनी म्हटले होते.

  • भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहे. मद्य सम्राट अशी त्यांची ओळख आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in