'एकनाथ शिंदेंनी पाठिंबा काढलाय? मला तो कागद दाखवा!'

जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार अजूनही स्थिर असल्याचे सांगितले.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

मुंबई - शिवसेनेचे आमदार मोठ्या संख्येत भाजपच्या गोटात गेल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत राज्यातील महाविकास आघाडी सरकार अजूनही स्थिर असल्याचे सांगितले. ( 'Support for Eknath Shinde? Then show me the paper ' )

जयंत पाटील म्हणाले, अजून अधिकृतपणे सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेतलेला नाही. त्यामुळे सरकार अस्तित्वात आहे, सरकारचे कामकाज सुरू आहे. प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्यांचा परिणाम होण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे, असे चित्र नाही. जे आमदार गुवाहटीला गेले आहेत त्यापेक्षा वेगळे काही महत्व यामध्ये नाही, असे सांगत जयंत पाटील यांनी शिवसेना आमदारांच्या बंडाची हवाच काढून टाकली.

Jayant Patil
एकनाथ शिंदे नॉटरिचेबल: सुप्रिया सुळे,जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीसोबत नको अशी भूमिका शिवसेना आमदारांची आहे, असे प्रसारमाध्यमातून पहात आहोत. त्यांना वेगळं व्हायचं असेल तर काही कारणं द्यावी लागतात. त्याप्रमाणे ते कारणं देत आहेत. आम्हीही अशी कारणे देऊ शकतो मात्र आम्ही अशी कारणे देणार नाही. सरकारमधून बाजूला होण्यासाठी किंवा महाविकास आघाडीतून बाजूला होण्यासाठी अडीच वर्ष एकत्र राहिल्यावर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू असताना अशा प्रकारची कारणे चुकीचे असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Jayant Patil
Video: भाजपने कितीही दावे केले तरी.. ; जयंत पाटील

बंडखोर शिवसेना आमदारांनी पाठिंबा काढला आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सरकारचा पाठिंबा कुणी काढलाय त्यांची नाराजी सुरू आहे. सरकारचा पाठिंबा कुणी काढलेला नाही. तुम्ही पाठिंबा काढायला उद्युक्त का करताय असा उलट सवाल जयंत पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींनी केला. शिवाय त्यांनी पाठिंबा काढला असेल तर कागद दाखवा. ते आपलं मत व्यक्त करत आहेत. एकनाथ शिंदे यांचा जय बोलत आहेत. एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे यामध्ये वेगळं काही आहे असं वाटत नाही. जे गेले आहेत ते परत येतील. उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे सरकारचा पाठिंबा कुणी काढून घेत नाही तोपर्यंत सरकारला कोणतीही भीती आहे असे वाटत नाही, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

अशापध्दतीने बोलणार्‍या नारायण राणे यांना कितीतरी वेळा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्या संकटकाळात सहकार्य, पाठिंबा व आधार देण्याचे काम केले आहे. याचे स्मरण जरी त्यांनी केले तरी त्यांना वाटेल आपण केलेले विधान मागे घ्यावे असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com