'संजय राऊत भोंगा वाजवत होते; म्हणून तुम्हाला मंत्रिपदे मिळाली!'

पत्राचाळ प्रकरणी शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची चौकशी ईडीकडून सुरु आहे.
Sanjay Raut, Sunil Raut
Sanjay Raut, Sunil Rautsarkarnama

मुंबई : पत्राचाळ प्रकरणी शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची चौकशी ईडीकडून सुरु आहे. न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची ईडी कोठडी दिली आहे. संजय राऊत यांची जबाब नोंदणी ईडीकडून सुरू आहे. जे सत्य आहे, तेच राऊत साहेब सांगतील. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आमच्या पाठीशी ठाम पणे उभी आहे, असे सुनील राऊत (Sunil Raut) यांनी सांगितले.

संजय राऊत कसे एकटे पडतील? आम्ही सोबत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्टेटमेंट दिले आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील फोन करून सोबत असल्याचे सांगितले आहे. भावना गवळी मागील काही महिने लापता होत्या, असा हल्लाबोल त्यांनी केला. जे सरेंडर होतात त्यांना क्लिन चिट मिळते. भावना गवळी यांना अटक केली होती का? मग त्यांना भेटण्याचा विषय कुठे येतो, असेही सुनील राऊत म्हणाले.

Sanjay Raut, Sunil Raut
CM शिंदेंनी कार्यकर्त्यांना आवरावं; फडणवीसांना असं वागतांना कधी बघितले नाही : अजित पवार

काल माझ्या आई ला भेटायला उद्धव साहेब आले होते. संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. त्या चौकशीतून काहीही भेटणार नाही. राऊत एकटे नाहीत सर्व शिवसैनिक त्यांच्या सोबत आहेत. शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते पाठीशी आहेत, सगळे विरोध दर्शवत आहेत. संजय राऊत लवकरच बाहेर येतील, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला.

Sanjay Raut, Sunil Raut
हडपसरमधील ‘त्या’ उद्यानाला आता एकनाथ शिंदेंऐवजी धर्मवीर आनंद दिघेंचे नाव

प्रविण राऊत यांना सात महिन्या पूर्वी अटक केल्यानंतर आताच ईडीला जाग कशी आली? राजकीय दबावाखाली ही कारवाई आहे. संजय राऊत भोंगा वाजवत होते म्हणून मविआ सरकार झाले आणि त्यांना मंत्री पद मिळाले, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com