मी गोव्याला जाणार होतो; चुकून गुवाहटी सांगितलं असावं : आमदार सुनिल राऊत

Shivsena | Sunil Raut | Sanjay Raut : संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत यांचे स्पष्टीकरण
Sanjay raut | Sunil Raut
Sanjay raut | Sunil RautSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे ३९ वे आमदार आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) हेही बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटात सहभागी झाले आहेत. आज सकाळपासून नॉट रिचेबल असलेले सामंत दुपारनंतर गुवाहटीला रवाना झाल्याचे वृत्त आले. त्यामुळे सामंंत यांच्यासह शिंदे गटातील अपक्षांसह आमदारांची संख्या आता ४६ वर गेली आहे. अशातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आमदार सुनिल राऊत हे देखील गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. (Shivsena | Sambhuraj Desai Latest News)

मात्र या चर्चा स्वतः सुनिल राऊत यांनी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, माध्यमांनी चुकून गुवाहटी सांगितला असेल, मी खरंतर निसर्गप्रेमी, त्यामुळे गोव्याला जाणार होतो. तिकडे जावून त्यांची तोंड बघण्यापेक्षा मी गोव्याला जाईल. बाकीच्या बातम्या केवळ जाणून-बुजून पसरवल्या जात आहेत. लोकांना आणि तिकडे असलेल्या आमदारांना कन्फ्युज करत आहेत, की संजय राऊत यांचा भाऊही गुवाहटीला जात आहे. सुनील राऊत हा बाळासाहेबांचा सैनिक आहे. आम्हाला कापलं तरी शिवसेना आणि बाळासाहेब असतील. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना आणि शिवसेना राहणार आहोत.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुनिल राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आज ते थेट शिंदे गटात सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यातून त्यांना मनातील धुसफूस दाखवून द्यायची आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

यावर बोलताना संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले असून, सुनिल राऊत हे मुंबईमध्येच असल्याचे सांगितले आहे. संजय राऊत म्हणाले, सुनिल राऊत हे सध्या मुंबईतच असून त्यांची कांजूरमार्ग येथे सभा सुरु आहे. मी माझे कुटूंब मेले तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत बेईमानी करणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. (Shivsena | Sambhuraj Desai Latest News)

खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून बंडखोर आमदारांवर सडकून टीका करत आहेत. सर्व बंडखोरांना मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दरवाजे कायमचे बंद असल्याचा दावा करत आहेत. मात्र आता त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत (Sunil Raut) हेच शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी शिवसेना घरातच फुटली की काय? असा सवाल विचारला जात होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com