Sanjay Raut : सोमय्या-राऊत 'सामना' पुन्हा रंगणार ; राऊतांना समन्स

Sanjay Raut | संजय राऊतांना ६ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
Sanjay Raut,  Kirit sommiya
Sanjay Raut, Kirit sommiyasarkarnama

मुंबई : भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी शिवसेना (Shiv Sena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरुध्द मानहानीचा खटला दाखल केला होता. माझगाव (Mazgaon) दंडाधिकारी न्यायालयाने (District Court) याप्रकरणी संजय राऊत यांना समन्स (Summons) बजावला आहे. राऊतांना ६ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. (Sanjay Raut news update)

राऊतांना समन्स बजावण्यात आल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा किरीट सोमय्या विरुध्द राऊत असा 'कलगीतुरा' लवकरच पाहायला मिळणार आहे.

सोमय्यांनी यापूर्वी शिवसेना, उद्धव ठाकरे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, अर्जुन खोतकर यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना विरुद्ध सोमय्या या वाद महाराष्ट्राला नवा नाही. आता राऊत या समन्सला काय उत्तर देतात हे लवकरच कळेल.

Sanjay Raut,  Kirit sommiya
BJP : भाजप महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल

काय आहे प्रकरण

  • राऊतांनी मेधा सोमय्या यांनी टॉयलेट घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याचा दावा केला आहे.

  • मीरा भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले.

  • 16 शौचालय बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला देण्यात आले होते.

  • संबंधीत बांधकामात बनावट कागदपत्रे सादर करून अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

  • मेधा सोमय्यांनी बनावट कागदपत्राद्वारे खोटी बिले काढून पैसे उकळलेत असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.

  • आरोपांविरुध्द मेधा सोमय्या यांनी राऊतांच्याविरोधात मानहानीचा दावा (Defamation Case) केला होता.

  • संबंधीत प्रकरणाची दखल माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com