लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर,भाजपकडून मावळ गोळीबाराची आठवण...

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी दिल प्रत्युत्तर
Sharad Pawar & Sudhir Mungantiwar
Sharad Pawar & Sudhir MungantiwarSarkarnama

मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेली टीका भाजपली चांगलीच झोबलेली दिसतेय. यावर भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर देतांना म्हणाले, काही लोकांना सत्तेपासून वंचित राहावे लागत आहे. म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे. लखीमपूरची घटना आणि जालियनवाला बाग हत्याकांड या दोन्ही वेगळ्या घटना आहे आणि चौकशी झाल्याशिवाय या प्रकारची प्रतिक्रिया देणे योग्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळ्या झाडल्या होत्या, ते कोण विसरू शकतो? अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे.

Sharad Pawar & Sudhir Mungantiwar
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले; आठ जणांचा मृत्यू : शेतकरी संघटनांचा आरोप

उत्तर प्रदेशात जालीयनवाला बागसारखी परिस्थिती आहे. देशातील शेतकरी हे कधीही विसरणार नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लखीमपूर घटनेत भाजपची तालिबानी वृत्ती पाहायला मिळाली. जनरल डायरप्रमाणे भाजपची वागणूक होती,अशी टीका केली होती. यास मुनगंटीवार यांनी मावळातील गोळीबाराची आठवण काढत प्रत्युत्तर दिले.

लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर बोलताना पवार म्हणाले, उत्तरप्रदेशात जालीयनवाला बागसारखी परिस्थिती आहे, देशातील शेतकरी हे कधीही विसरणार नाहीत. दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अडवले जाते, शेतकरी नेत्यांना रोखले जात आहे. हा सत्तेचा गैरवापर केला जातोय. देशातील विरोधी पक्ष शेतकऱ्यांसोबत असेल. देशातील जनता सरकारला धडा शिकवेल. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण भाजपला यात यश मिळणार नाही. देशातला शेतकरी याच केंद्र सरकारला उत्तर देईल. केंद्र असो की राज्य सरकार, या घटनेची संपूर्ण दबाबदारी भाजपची आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा, आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली होती.

Sharad Pawar & Sudhir Mungantiwar
आमदार नीलेश लंके यांचे साधे घर पाहून शरद पवार झाले चकीत

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये ता.३ ऑक्टोबर शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. या घटनेत व यानंतर झालेल्या हिंसाचारात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारात ठार झालेल्या 8 जणांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, या अहवालानुसार बहुतेक मृत्यू हे जबर मार, शॉक किंवा रक्तस्त्राव होऊन झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com