भाजपकडून सुधीर मुनगंटीवार आणि लक्ष्मण जगताप यांचे सर्वात शेवटी मतदान

Legislative Council elections 2022 | पाचवाही उमेदवार जिंकून आणायचा असेल तर भाजपला एकूण 130 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
Lakshman Jagtap| Sudhir Mungantiwar
Lakshman Jagtap| Sudhir Mungantiwar

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. आतापर्यंत एकूण 203 आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. त्यात आतापर्यंत भाजपच्या (BJP) 104 आमदारांचे मतदान झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपल्या आमदारांचे मतदान पार पाडले आहे. तर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे अद्याप मतदान झालेले नाही. हे दोघेही सर्वात शेवटी मतदान करणार आहेत. (Legislative Council elections 2022)

निवडणुकीत सर्व पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राज्यसभा निवडणूकी प्रमाणे आमदार लक्ष्मण जगताप हेदेखील मुंबईकडे रवाना झाले असून काही वेळात ते देखील आपला मतदानाचा हक्क बजावतील. तर सुधीर मुनगंटीवार हे नागपूला असल्याने तेदेखील आज सकाळी विमानाने मुंबईत पोहचले आणि आपला मतदानाचा हक्क बजावतील

Lakshman Jagtap| Sudhir Mungantiwar
विधानपरिषद निवडणूक : पक्षादेश पाळणं आमच्या रक्तात : मुक्ता टिळक

भाजपने राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणूकीत पाच जणांना उमेदवारी दिली आहे. पण पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. सध्या भाजपचे 106 आमदार आहेत. अपक्षांच्या मदतीने भाजपचे संख्याबळ 113 पर्यंत पोहोचत असल्यामुळे त्यांचे चार उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात.

पण पाचवाही उमेदवार जिंकून आणायचा असेल तर भाजपला एकूण 130 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे भाजपला 17 अधिकच्या आमदारांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाचवी जागा लढवणं सोपं नसल्याचं मान्य केलं आहे. या निवडणूकीत राज्यसभा निवडणुकीचे गणित पाहता भाजपला 123 मतं मिळाली होती. ही मते कायम राहिली तरी विधानपरिषदेत पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला आणखी 7 मतांची गरज आहे.

भाजपने पाच उमेदवारांना विधानपरिषद निवडणूकीत उतरवलं आहे. विधान परिषदेचे विरोधपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान. राज्यसभा निवडणुकीत दोन आजारी आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानामुळे भाजपला हे यश मिळालं होतं. आता विधानपरिषदेसाठीही (Legislative Council election 2022) हे दोन्ही आमदार मतदान करणार आहेत. मुक्ता टिळक यांनी मतदानाचा हक्क बजावसा असून आता लक्ष्मण जगताप यांचे मतदान अजून बाकी आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार यांनीदेखी अद्याप मतदान केलेले नाही. हे दोघेही सर्वात शेवटी मतदान करणार आहे.

आज सकाळी कसबापेठ मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक या पुण्याहून ऍम्ब्युलन्सने विधानभवनात पोहचल्या आणि त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना टिळक म्हणाल्या, "पक्षाने दिलेला आदेश पाळायचे हे आमच्या रक्तात भिनलेले आहे. म्हणून मी मतदानाला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com