राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया : तीन महिन्यांपर्यंत कुठलाही दौरा नाही

राज ठाकरे आयसीयूमध्ये नसून सामान्य खोलीमध्ये आहेत. एका आठवड्यात ते घरी जातील
राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया : तीन महिन्यांपर्यंत कुठलाही दौरा नाही
Raj Thackeraysarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सोमवारी (ता. २० जून) हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील लीलावती रुग्णालयात ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर राज यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, सुमारे दोन ते तीन महिने राज ठाकरे यांना कुठलाही दौरा करता येणार नाही. मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. (Successful hip bone surgery on Raj Thackeray)

Raj Thackeray
रुपाली चाकणकरांविरोधात आक्षेपार्ह कमेंट : बार्शीच्या तरुणाला अटक; २८ जणांवर गुन्हा

राज ठाकरे यांच्या पायाचे दुखणे अधिक वाढल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर म्हटले आहे की, शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या चाचण्या करण्यासाठी राज ठाकरे शनिवारी (ता. १८ जून) लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. याआधीदेखील राज ठाकरे शस्त्रक्रियेसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल झाले होते. पण, तेव्हा त्यांच्या शरीरात कोरोनाचे डेड सेल्स आढळून आले होते. यामुळे त्यांना ॲनेस्थेशिया म्हणजे भुलीचे इंजेक्शन देता येऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

Raj Thackeray
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत हितेंद्र ठाकूरांचे मोठे वक्तव्य!

रुग्णालयाचे डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या डावा हिपचे रिप्लेसमेंट झाले आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. ते आयसीयूमध्ये नसून सामान्य खोलीमध्ये आहेत. आजपासून फिजिओथेरेपी सुरू झाली आहे. एका आठवड्यात ते घरी जातील आणि दोन ते तीन महिन्यांच्या विश्रातीनंतर ते दौरेही करू शकतील, असे पारकर यांनी स्पष्ट केले. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विनोद अग्रवाल, प्लास्टिक सर्जन डॉ. सिद्धार्थ प्रकाश, डॉ. आनंद उत्तुरे आणि डॉ. बोरुडे यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in