आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचे पृथ्वीराज चव्हाणांना साकडे...

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ''माझ्या काळात राणे समिती गठीत केली होती. त्या समितीने दोन्ही समाजाचा सखोल अभ्यास करून अहवाल तयार केला. मराठा समाजासह मुस्लिम समाजाला त्यानुसार आरक्षण दिले गेले''.
Statement of the community to Prithviraj Chavan for the Muslim community to get reservation
Statement of the community to Prithviraj Chavan for the Muslim community to get reservation

कऱ्हाड : अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण आता मागे पडले. ते आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न करावेत, या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत श्री. चव्हाण यांची भेट घेतली. या वेळी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. Statement of the community to Prithviraj Chavan for the Muslim community to get reservation

यामध्ये राज्य उपाध्यक्ष इब्राहिम शेख, विदर्भ विभागाचे अध्यक्ष ओयस कादरी, औरंगाबाद विभागाचे अध्यक्ष अहमद चाऊस, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष अहमद जब्बार, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नदीम मुजावर, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष झाकीर पठाण आदी उपस्थित होते. 

श्री. चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला १६ टक्के, तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिले होते; पण कालांतराने आरक्षणाला आव्हान दिल्याने त्याला स्थगिती मिळाली. भाजपच्या काळात दोन्ही आरक्षण रद्द झाली. तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना श्री. चव्हाण यांच्या सरकारचा आहे, तसा अहवाल विधानसभेत मांडला व नंतर पारित करून मंजूर केला. 

त्यामध्ये मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा कोणताही उल्लेख नव्हता. ते आरक्षण पुन्हा द्यावे, यासाठी मुस्लिम समाजातील शिष्ठमंडळाने पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आरक्षण पुन्हा आपल्या प्रयत्नातून मुस्लिम समाजाला मिळावे, यासाठी आपला प्रयत्न व्हावा, अशी विनंती शिष्टमंडळाने श्री. चव्हाण यांच्याकडे केली. 

यावेळी आमदार चव्हाण म्हणाले, ''माझ्या काळात राणे समिती गठीत केली होती. त्या समितीने दोन्ही समाजाचा सखोल अभ्यास करून अहवाल तयार केला. मराठा समाजासह मुस्लिम समाजाला त्यानुसार आरक्षण दिले गेले; पण पुढील सरकारच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे आरक्षण अस्तित्वात आले नाही. आम्ही आरक्षण दिल्यानंतर काहींना फायदा झाला; पण नंतर आव्हान दिले गेले. पुन्हा एकदा आरक्षणासाठी समाजाने एकत्र राहात विचारांची व न्यायालयीन लढाई करून आरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी माझे सहकार्य कायमच राहील व मी प्रयत्नशीलही राहिन.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com