Roshani Shinde Attack Case : रोशनी शिंदे हल्ल्याप्रकरणी महिला आयोग आक्रमक ; पोलीस आयुक्तांना..

Roshani Shinde Attack Case News : रोशनी शिंदे यांना शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Roshani Shinde News :  Uddhav Thackeray On Roshni Shinde Attack :
Roshani Shinde News : Uddhav Thackeray On Roshni Shinde Attack : Sarkarnama

Roshani Shinde Attack Case News : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर ठाण्यात नुकताच हल्ला झाला होता. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या विषयावरुन ठाकरे गट-शिवसेना यांच्यात जुंपली आहे. आरोप-प्रत्यारोपांनी फैरी झडत आहेत.

रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणाचा अहवाल ठाणे पोलीस आयुक्तांकडून राज्य महिला आयोगाने मागवला आहे.

आज उपस्थित राहून या प्रकरणाचा अहवाल द्यावा, असा आदेश राज्य महिला आयोगाने ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना दिला आहे. सोमवारी रात्री ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यात राडा झाला. यात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याप्रकरणात महाविकास आघाडीच्या वतीने काल (बुधवारी) युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चोचे आयोजन केले होते.

Roshani Shinde News :  Uddhav Thackeray On Roshni Shinde Attack :
BJP foundation day : वाजपेयींच्या त्या भाषणांची आठवण करुन देत पवारांनी दिल्या भाजपला खोचक शुभेच्छा!

ठाण्यातल्या रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाचे पडसाद चांगलेच उमटताना दिसत आहेत. रोशनी शिंदे यांची रूग्णालयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी विचारपूस केली.

Roshani Shinde News :  Uddhav Thackeray On Roshni Shinde Attack :
Ghulam Nabi Azad : 'आझाद' मधून काँग्रेस नेत्यांची पोलखोल ; जयराम रमेश यांच्यावर गंभीर आरोप.. ; कलम ३७० बाबत..

"रोशनी शिंदे या गर्भवती नव्हत्या असा रिपोर्ट आला आहे," असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला असता उद्धव ठाकरे चांगलेच संतापले, “रोशनी शिंदे या गर्भवती नव्हत्या असा रिपोर्ट आला आहे. पण मग पोटात लाथा मारण्याचं समर्थन कसं काय होऊ शकतं? रोशनी हात जोडून त्यांना सांगत होती की मला पोटात मारू नका तरीही त्यांना पोटात मारण्यात आलं. गयावया करणाऱ्या महिलेला अशा प्रकारे मारहाण करणाऱ्या लोकांना या ठाण्यात काय राज्यातच राहण्याचा अधिकार नाही. यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे," असे ठाकरे म्हणाले.

"ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडीओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली. मला वाटतं आता या प्रकरणी फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही," असे ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com