मुंबईतील दोन हाॅटेल्स आमदारांनी गजबजणार.. मंत्र्यांनाही मुंबईत पाचारण केले...

या निवडणुकीत राजकीय दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपकडून मुंबईतील पंचतारांकीत हॉटेल आरक्षीत करण्यात येत आहेत.
Mahavikas Aghadi Vs BJP
Mahavikas Aghadi Vs BJPSarkarnama

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या (MLC Election 2022) तयारीसाठी महाविकास आघाडी आणि भाजप या दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजप आमदारांना हाॅटेल ताजमध्ये आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना पवईमधील हाॅटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय झाला आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख मंत्र्यांना तातडीने मुंबईत बोलविण्यात आले आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज दुपारी आपल्या आंबेगाव मतदारसंघाचा दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईकडे निघाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

राज्यात नुकत्याच राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. सोमवारी ( ता. 20 ) राज्यातील विधानपरिषदेतील जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राजकीय दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपकडून मुंबईतील पंचतारांकीत हॉटेल आरक्षित करण्यात येत आहेत. या हॉटेलांत आमदारांना दोन दिवस स्थानबद्ध करण्यात येईल. या हॉटेलांच्या आरक्षणाची राज्यभर चर्चा होत आहे. ( State MLAs to be stationed in Mumbai hotels: Preparations for Legislative Council elections )

विधानपरिषद निवडणुकीत मतदार फुटू नये यासाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना 18 जूनलाच मुंबईत बोलावून घेतले आहे. तर भाजपही त्यांचे आमदार 18 जूनपासून ताज हॉटेलमध्ये ठेवणार आहे. विधानपरिषद निवडणूक गुप्त असल्याने राजकीय पक्षांकडून हॉटेल बुक करून आमदारांना निगराणी खाली ठेवण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

Mahavikas Aghadi Vs BJP
विधानपरिषद निवडणूक : भाजपचे ४ उमेदवार विजयी झाल्यास पराभूत होणारा पाचवा चेहरा कोणाचा?

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या महाराष्ट्रातील जागांच्या निवडणुकीत काही आमदार फुटले होते. या निवडणुकीत भाजपकडून घोडेबाजार झाला असा आरोप महाविकास आघाडीकडून होत आहे. तर भाजपने या निवडणुकीतील शिवसेनेच्या पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीसारखा प्रकार विधानपरिषद निवडणुकीत होऊ नये यासाठी राजकीय पक्ष काळजी घेताना दिसत आहेत.

Mahavikas Aghadi Vs BJP
सुरेश धस म्हणाले, पुन्हा विधानपरिषद निवडणूक लढणार नाही

पवई येथील रेनीसन या हॉटेलमध्ये शिवसेनेचे आमदार थांबणार आहेत. तेथेच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षातील आमदारही थांबणार आहेत. 19 जूनला महाविकास आघाडीची बैठक होईल. यात आमदारांना मतदान प्रक्रिया कशी असणार याबाबत माहिती दिली जाणार आहे. भाजपने गट करून आमदारांशी संपर्क केला आहे. या गटांवर संबंधित आमदारांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील हे दोन हॉटेल्स राजकीय आखाडे बनणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in