एसटी कर्मचाऱ्यांचा संप तरी वेतनासाठी दोनशे कोटींची तरतूद

परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी जाहीर केल्याप्रमाणे नवीन वेतनवाढ मिळणार
ST strike
ST strikesarkarnama

मुंबई : एसटी महामंडळाच्या (ST strike) कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेळेत वेतन देता यावे यासाठी २०० कोटी रुपये वेतनासाठी वितरीत करण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली आहे.

दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ एसटीचा संप सुरु असल्याने राज्य सरकारला ६५० कोटींचा तोटा सहन करायला लागत असतानाही एसटीच्या कर्मचार्यांचे वेतन वेळेत व्हावे याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली असल्याने वेतनासाठी २०० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

ST strike
ST Strike : वकिलपत्र काढल्यानंतर सदावर्ते यांची पवार व परब यांच्यावरच टीका

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात एसटी महामंडळासाठी १ हजार १५० कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे. यातूनच वेतनासाठी २०० कोटी रुपये वितरीत करण्यास वित्त विभागाने मंजूरी दिली आहे. दरम्यान, एसटीच्या सुरु असलेल्या संपकाळात एसटी महामंडळाचे ६५० कोटींचे नुकसान झाले आहे. कोवीडच्या काळात महामंडळाची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने कर्मचार्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने २ हजार ५०० कोटी रुपयाची आर्थिक मदत महामंडळाला केली.

ST strike
ST कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग; अनिल परबांचे मोठे आश्वासन

परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले, एसटी कर्मचार्यांच्या वेतनाची जबाबदारी राज्य सरकारने घेतलेली आहे. एसटीच्या कर्मचार्यांनी चांगली वेतनवाढ देण्यात आली असून इतर राज्यांच्या तुलनेत साधारण बरोबरीची किंवा काही राज्यांच्या तुलनेत अधिक वेतन कर्मचार्यांना देण्यात आले. एसटीच्या कर्मचार्यांना देण्यात आलेली वेतनवाढ ही एक ते १० वर्षे सेवा झालेल्यांना ५ हजार, १० आणि २० वर्षे सेवा झालेल्यांना ४ हजार, २० वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्यांना अडीच हजार ही वेतनवाढ ही मूळ वेतनात करण्यात आलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in