`रयत`च्या कर्मचाऱ्यांकडून 2 कोटी 75 लाखांची देणगी मुख्यमंत्री निधीला

मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
sharad-pawar-uddhav-thacera.jpg
sharad-pawar-uddhav-thacera.jpg

मुंबई :  रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड १९  करीता 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 इतका निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्द केला. रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी या निधीसाठी त्यांचे एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदींचे या योगदानासाठी आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुकही केले आहे. कोविड-१९ विषाणूमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत अशा रितीने एकत्र होणारा निधी, गरजूंच्या उपचारासाठी मदतीचा हातभार ठरणार असल्याचे, त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19
मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. 

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 

 
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch, 
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com