ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी संपता-संपेनात, दहा तारीख आली; वेतनाचं काय होणार?

ST Workers : कर्मचाऱ्यांमध्ये आता तीव्र रोष निर्माण झाला आहे.
ST Workers
ST Workerssarkarnama

ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या संपता संपत नाहीत. महाविकास आघाडी सरकार असताना भाजपच्या नेत्यांकडून एसटी कामगारांच्या प्रश्नांवरून अनेकदा आंदोलनं झाली, संप पुकारण्यात आला होता. महामंडळाचे शासनात विलीनिकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होत होती. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतरहोऊन राज्यात शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र सरकार बदलले तरी एसटी कामगारांच्या समस्या संपताना दिसत नाहीत.

ST Workers
Sanjay Raut News : शिंदे सरकारबद्दल संजय राऊतांचं विधान खरं होणार? सरन्यायाधीशांची महत्त्वाची टिप्पणी

महिन्याची १० तारीख उलटून गेली. मात्र अजूनही राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांना मिळालेले नाही. मागील वर्षीही वेतन मिळत नसल्यामुळे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिन्यापर्यंत संप पुकारलेला होता. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना, राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराची हमी घेतलेली होती. यानुसार राज्य सरकारने महिन्याच्या दहा तारखेआधीच वेतन देण्याचे मान्य केले गेले होते.

२०२३ च्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात दहा तारखेचा आता अर्धा दिवस उलटल्यानंतरही राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन झालेली नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आता तीव्र रोष निर्माण झाला आहे. या नव्या वर्षातही पुन्हा मागील वर्षाचाच कित्ता महामंडळ आणि सरकार गिरवणार का? असा संतप्त सवाल एसटी कर्मचारी विचारत आहेत.

ST Workers
Ashok Chavan म्हणाले, साडेपाच तासांचा प्रवास; अन् त्यात तब्येतही ठीक नाही !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com