
ST Workers : एसटी कर्मचारी जनसंघने कडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) संलग्न असणाऱ्या एसटी युनियनबाबत गंभीर आरोप केले आहेत. तसेच यामागे राष्ट्रवादीचा शिंदे - फडणवीस (Shinde_Fadnavis) सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे, असे आरोपही करण्यात येत आहे.
2017 साली राष्ट्रवादीच्या यांच्या एसटी युनियनने एक आंदोलन केलं होते. युनियनकडून दोन दिवसांचा संप केला गेला होता. दोन दिवसात एसटी विरोधात संप केल्यामुळे, या संपाची भरपाई म्हणून एकूण 96 कोटी रूपये वसूल करण्यास सांगण्यात आले होते. मात्र ही भरपाई कामगारांकडून वसूल करण्यात आला, असा दावा करणयात येत आहे.
राष्ट्रवादीच्या एसटी युनियनने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला बदनाम करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून ही भरपाईची रक्कम वसूल करण्यासाठी पत्र काढत आहे, असाही दावा केला जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे, त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत.म्हणून आम्ही व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यालयात आंदोलन केलं कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करू नका अशी आमची मागणी आहे. याबाबत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन व्यवस्थापीय संचालक शेखर चने यांनी दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.