ST Workers : 'एसटी'साठी ३०० कोटी मंजूर : कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होणार का?

ST Workers : निधीतून मूळ वेतनाची रक्कम बँकेत जमा होणार आहे.
ST Workers
ST Workerssarkarnama

ST Workers : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा संक्रांत गोड असणार आहे. मागील कित्येक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार अखेर त्यांना मिळणार आहे.एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगार वितरणासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकने मंजूर केला आहे. यामुळे आता कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा पगार अखेर मिळणार आहे.

पगार वेळेवर मिळत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा राज्यस्तरीय आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे राज्य सरकारने आज अखेर हा निधी जाहीर केला. या संबंधी आता राज्य सरकारने ३०० कोटींच्या तरतुदीचेएक परिपत्रक जाहीर केले आहे.

राज्य सरकारने एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केले असले तरी, यामध्ये केवळ कर्मचाऱ्यांचा मूळ पगार होईल, मात्र यामध्ये गॅच्युटी, भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे भरले जाऊ शकणार नाही, अशी माहिती मिळत आहे. तसेच आजच पगार होईल का? याबाबतही स्पष्टता नाही. या वितरीत निधीतून मूळ वेतनाची रक्कम बँकेत जमा होणार आहे.

ST Workers
ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी संपता-संपेनात, दहा तारीख आली; वेतनाचं काय होणार?

कर्मचाऱ्यांचे वेतन 10 तारखेच्या आतच होणार असे आश्वासन राज्य सरकारनकडून न्यायालयात दिले गेले होते. असे असले तरी मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नाही. महिन्याची १३ तारीख उलटली तरी पगार जमा झाले नव्हते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारीही दिला होता.

ST Workers
Satyajeet Tambe News; तांबेचा डाव हा तर प्री प्लॅन मिशन लोटस!

सरकारनं दिलेली रक्कम अपुरी :

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी दिले मात्र असले तरी ही तरतूद पुरेशी नसल्याचे काँग्रेस पक्ष संलग्न असलेल्या एसटी संघटनेने म्हंटले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत निश्चितपणे होण्यासाठी प्रत्येक महिन्याला ३६० कोटी रुपये देणे आवश्यक आहे. तशी शाश्वती सरकारकडून न्यायालयात दिली गेली होती. मात्र सरकारकडून अपुराच निधी दिला जातो. कर्मचाऱ्यांची देण्याचे पैसे एकूण १ हजार २०० कोटींच्या घरात थकबाकी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in