ST Strike : वकिलपत्र काढल्यानंतर सदावर्ते यांची पवार व परब यांच्यावरच टीका

एसटी कर्मचारी कृती समितीने गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांची वकिली नाकारत त्यांच्याकडून वकिली काढून घेतल्यानंतर सदावर्तेंनी आपली भूमिका मांडली आहे.
Gunratna Sadavarte
Gunratna Sadavarte Sarkarnama

मुंबई : एसटी विलीनीकरणाचा (ST merger) मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत आहेत. मात्र आज एसटी कर्मचारी कृती समितीने अॅड गुणरत्न सदावर्ते यांची वकिली नाकारत त्यांच्याकडून वकिली काढून घेतली. मात्र कृती समितीच्या या निर्णयाला एसटी कर्मचाऱ्यांनी विरोध करत सदावर्तेच त्यांची बाजू उच्च न्यायालयात ( high Court) मांडणार असल्याची भूमिका घेतली आहे. या सर्व गोंधळात गुणरत्न सदावर्ते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

- गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

'एसटी कमचाऱ्यांचा संप अजुनही सुरूचं आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनासोबत बैठक घेतली. मात्र ही बैठक म्हणजे दवाबचं राजकारण आहे. तसेच शरद पवार आणि अनिल परब यांनी घेतलेली ही बैठत बेकायदेशीर असल्याचा आरोपही त्यांनी केला एसटी कमचारी हे अजुनही माझ्या बाजुने आहेत त्यामुळे अजुनही त्याचं वकील पत्र माझ्याकडेचं राहणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, माझ्याकडे 75 हजार कष्टकरी कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र आहे, मला या संघटनांच्या वकीलपत्रांची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी शरद पवार यांच्यावहरी टीका केली. शरद पवार काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का, असा सवाल त्यांनी विचारला आणि मुख्यमंत्र्यांकडे न जाता परब हे पवारांकडे का गेले, अशीही विचारणा केली. माझ्याकडे 75 हजार कष्टकऱ्यांचे वकीलपत्र आहे, मला या संघटनांच्या वकीलपत्रांची गरज नसल्याचे सांगत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक मृत्यूला यापुढे पवार जबाबदार असतील, असे बेफाम विधान त्यांनी केले. न्यायालयातील प्रकरणावर पवार कसे बोलले? पवारांनी पु्न्हा कायदा हातात घेतला, अशी टीका त्यांनी केली.

Gunratna Sadavarte
ST Strike : सदावर्ते आणि न्यायालय हेच आमचे मालक; संघटनांची बैठक कामगारांनी नाकारली

- आज काय घडले?

सह्याद्री अतिथीगृहावर एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक पार पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एस.टी. विभागातील अधिकारी, संबंधित संघटनांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

- कृती समितीने सदावर्तेंची वकिली नाकारली

या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. 'एसटी विलीनीकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) न्यायालयात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडत होते. मात्र एसटी कृती समितीने सदावर्ते यांच्याकडून वकिली मागे घेतली असल्याची घोषणा अक्षय गुजर यांनी केली.

Gunratna Sadavarte
ST Strike; आज हेकेखोर संपकरी कर्मचाऱ्यांचे मार्ग बंद होणार?

- कर्मचाऱ्यांनी कृती समितीची बैठकच नाकारली

तर दुसरीकडे आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी या घोषणेला नाकारत गुणरत्न सदावर्तेच त्यांची बाजू न्यायालयात मांडतील. सदावर्ते आणि न्यायालयच आमचे मालक आहेत. मंत्री अनिल परब यांच्याशी झालेल्या बैठकीशी आमचा काही संबंध नाही, अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. तसेच, गुणरत्न सदावर्ते यांची एक लाख कर्मचाऱ्यांनी वकील म्हणून निवड केली आहे. मिटिंग घ्यायची असेल तर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत घ्या, असेही एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com