मोठी बातमी : दहावीच्या परीक्षेऐवजी अंतर्गत मूल्यमापन अन् बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

राज्यात लॉकडाउन लावण्याची तयारी सरकारने केली आहे. यामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
ssc exams are cancelled and hsc exams are postponed in maharashtra
ssc exams are cancelled and hsc exams are postponed in maharashtra

मुंबई : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उद्यापासून कडक लॉकडाऊन लावण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. दहावीच्या परीक्षेऐवजी अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

राज्यात संपूर्ण लॉकडाउन करण्याची मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (ता.21) घोषणा करणार असून, उद्या रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाउन लागू होण्याची शक्यता आहे. या बैठकीत लॉकडाउन लावण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, उद्या रात्री 8 वाजल्यापासून राज्यात संपूर्ण लॉकडाउन लावावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आता याबद्दलचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. 

राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या पुढे ढकलण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले. यानंतर बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे 12 एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता. आता दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनन करण्यात येणार आहे.

दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्याबाबत तज्ञांशी चर्चा केली जाणार आहे. निकाल कसा तयार करायचा याचे निकष लवकरच जाहीर केले जाणार आहेत. जास्त गुणांची अपेक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत भविष्यात निर्णय घेतला जाईल. सीबीएसई बोर्डाने तसेच, आयसीएसई बोर्डानेही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व बोर्डांच्या निर्णयांमध्ये समानता राहावी म्हणून राज्य मंडळानेही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com