श्रीकांत शिंदेंनी, अनुराग ठाकुरांना दिलेल्या शालीचीच चर्चा

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) हे तीन दिवसीय कल्याण दौऱ्यावर आहेत.
Shrikant Shinde, Anurag Thakur
Shrikant Shinde, Anurag Thakursarkarnama

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी कल्याणच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांचे स्वागत केले. यावेळी शिंदे यांनी ठाकुर यांना शाल दिली, त्या शालिचीच अधिक चर्चा रंगली आहे.

शिंदे यांनी भगव्या रंगा सोबतच 'जय श्री राम' नाव लिहिलेली शाल पांघरुन अनुराग ठाकुर यांचे स्वागत केले. शिवसेनेच्या वतीने भगव्या शाली पांघरुन कायम मान्यवरांचे स्वागत करण्यात येते. त्यामुळे या शालीची चर्चा यावेळी चांगलीच रंगली होती. हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना भाजपची युती झाली आहे. त्याचेच प्रतिक म्हणून ही शांल ठाकुर यांना सन्मानार्थ देण्यात आल्याचे शिंदे गटाने सांगितले.

Shrikant Shinde, Anurag Thakur
पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारपासून मुक्त होणार? डॉ. सुब्रमण्यम स्वामींची मोठी घोषणा

दरम्यान, यावेळी अनुराग ठाकुर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी यांच्यावर निशाणा साधला. अनुराग ठाकुर म्हणाले, हिंदू धर्माला कमीपणा दाखविण्याचे काम काँग्रेसने केले आहे. इंग्रज तर गेले परंतु त्यांच्या विचाराने चाललेली कॉंग्रेस पार्टी भारत जोडो ची गोष्ट करते. मात्र, त्यांनी नेहमीच भारत तोडून राज्य करण्याचे काम केले आहे. राहुल गांधी यांचे दौरे सुरु आहेत. आजही ते एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधात भडकवण्याचे काम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

राजकीय लाभासाठी कोणत्याही स्तरावर ते गेले असून हिंदू धर्माला खाली दाखवण्याचे काम ते करीत आहेत. असे काम त्यांनी नाही केले पाहीजे असा हल्लाबोल ठाकुर यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. भाजपाच्यावतीने ठाकुर यांचा तीन दिवसीय कल्याण लोकसभा मतदार संघ दौऱ्याचे आयोजन केले आहे. रविवारी या दौऱ्याची सुरुवात झाली. डोंबिवलीतील सुयोग हॉटेल नाका येथे त्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.

याठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधताना अनुराग यांनी वरील वक्तव्य केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सरकार योग्य पद्धतीने चालत असून ज्या इंग्रजांनी 200 वर्षे भारतावर अधिकार गाजविला त्यांनाही मागे टाकून आज भारत देश अर्थव्यवस्थेत जगात पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सूचित केले.

Shrikant Shinde, Anurag Thakur
खासदार श्रीकांत शिंदेंचे भाजपला उत्तर; ‘माझे जे काही होईल, ते कल्याणमधूनच...’

या वेळी कार्यकर्त्यांनी 'जय श्री राम' अशी घोषणा केली. त्यावर मंत्री अनुराग म्हणाले, जय श्री रामचे नारे आज आपण लावत आहोत त्यासाठी 400 वर्षे लढाई लढावी लागली. रामलल्ला चा जन्म झाला तिथे भव्य राम मंदिर व्हावे त्यासाठी देखील न्यायालयात अनेक वर्षे लढाई लढावी लागली. मात्र, आता त्याचा निकाल लागला आहे. ही चांगली वेळ तेव्हा आली जेव्हा तुमच्या सर्वांच्या सहाय्याने मोदींचे सरकार देशात आले. पुढील एक वर्षाच्या आत भव्य राम मंदिर उभे राहीले जे आपले सर्वांचे स्वप्न होते ते पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com