राजकारण तापलं! भाजपच्या गोटात हालचालींना वेग: आमदारांना महत्त्वाच्या सूचना
Devendra Fadanvis

राजकारण तापलं! भाजपच्या गोटात हालचालींना वेग: आमदारांना महत्त्वाच्या सूचना

Eknath Shinde latest news | BJP | राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपही अलर्ट मोडवर आली आहे

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजपही अलर्ट मोडवर आली आहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परदेश दौऱ्यावर जाऊ नका, पुढचे दोन-तीन दिवस संपर्कात राहा, बोलावण्यात आलं तर तातडीने मुंबईत दाखल व्हा,असे आदेश भाजपने आमदारांना दिले आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणूकांनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीत मोठी खळबळ माजली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे. आपल्यासोबत अपक्षांसह शिवसेनेचे 46 आमदार असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिुंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाण्याचे ठरवले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

Devendra Fadanvis
एकनाथ शिंदेंनी पक्क ठरवलंय! उद्धव ठाकरेंना स्पष्टच सांगितलं...गुवाहाटीतून दिला संदेश

पण एकनाथ शिंदेंच्या या बंडाचा राज्यातील राजकारणावर थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे जवळपास 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आपल्या समर्थकांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचीही चर्चा आहे.

एकनाथ शिंदे यांच्यामागे चाळीसहून अधिक आमदार असल्याने पक्ष फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मन वळवण्यासाठी मिलिंद नार्वेकरांना सुरतमध्ये चर्चेसाठी पाठवले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शिंदे यांनी पुढं काय करायचं हे पक्क ठरवलं असून तसा निरोप ठाकरेंपर्यंत पोहचवला असल्याचे स्पष्ट झालं आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात

शिवसेनेत (Shivsena) बंड होऊन एकनाथ शिंदे आणि काही आमदार फुटणार असल्याची कल्पना भाजपमधील एका बड्या नेत्यांला सोमवारीच होती. या बड्या नेत्यांशी हातमिळवणी करूनच शिंदे यांनी थेट गुजरात गाठल्याचेही समोर आले आहे. दुसरीकडे, गुजरातमध्येच शिंदेसह त्यांच्या आमदारांची बडदास्त ठेवून त्यांना सुरक्षित ठेवण्याचीही जबाबदारी या बड्या नेत्यांनेच उचलली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदेंच्या नाराजीचा फायदा उठवून ठाकरे सरकारला खिंडीत गाठण्याचा डाव भाजपने टाकल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in