न्यायालयाकडून मलिकांना मोठा दिलासा; खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी

मनी लाँर्डिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले मंत्री नबाव मलिक यांना अटक केली आहे.
Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering Case, Nawab Malik Latest Marathi News
Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering Case, Nawab Malik Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : मनी लाँर्डिंग प्रकरणात ईडीने अटक केलेले मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. वैद्यकीय कारणासाठी त्यांनी मागितलेला तात्पुरता जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. पण खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. (Nawab Malik Latest Marathi News)

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात मलिकांच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. मागील आठवड्यात न्यायालयाने मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत २० मेपर्यंत वाढ केली आहे. (Special PMLA court allows Nawab Malik to get treated at a private hospital)

Nawab Malik News updates, Nawab Malik Money Laundering Case, Nawab Malik Latest Marathi News
महत्वाची बैठक सुरू असताना मोर आला अन् मोदींनी..! शहांनी सांगितला संवेदनशीलतेचा किस्सा

मलिकांनी सहा आठवड्यांसाठी तात्पुरता जामीन देण्याची विनंती केली होती. मुत्रपिंडाच्या त्रासामुळे पायांना सूज येत आहे. त्याशिवाय अन्यही आजार आहेत. मूत्रपिंडाच्या आजारावर जे. जे. रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयात शस्त्रिक्रियेद्वारे कायमस्वरूपी उपचार करण्याची गरज असल्याने तात्पुरता जामीन द्यावा, अशी विनंती अर्जात करण्यात आली होती.

मात्र, न्यायालयाने जामीन न देता त्यांना खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी देत दिलासा दिला आहे. त्यांच्याजवळ कुटुंबातील एका व्यक्तीला थांबण्याची परवानगी देण्यात आली आहे. सुरक्षाव्यवस्था व उपचाराचा संपूर्ण खर्च मलिकांना करावा लागेल, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

कुर्ला येथील जमीन व्यवहारात दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरसोबत झालेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणात मलिकांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली आहे. तेव्हापासून नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com