वयाच्या १९ व्या वर्षीच आमदाराच्या मुलीला पळवून नेले अन् लग्न केले!

विधान परिषदेतील (Legislative Council) १० सदस्य ७ जुलै २०२२ रोजी निवृत्त होत आहेत.
Prasad Lad News, Prasad Lad Life Story in Marathi
Prasad Lad News, Prasad Lad Life Story in Marathi Sarkarnama

मुंबई : विधान परिषदेतील (Legislative Council) १० सदस्य ७ जुलै २०२२ रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे सभागृहात आज (ता. २३ मार्च) निरोप समारंभ पार पडला. त्यामध्ये भाजपचे (BJP) नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा समावेश आहे. त्यांनी निवृत्त होताना आपल्या भावना व्यक्त केल्या. (Prasad Lad News)

निरोपाच्या शुभेच्छा देताना अनेक सदस्यांनी प्रसाद लाड यांचा उद्योजक असा उल्ले केला. त्यावर त्यांनी आपल्या भाषणात जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी लाड म्हणाले, मी टाईम्स ऑफ इंडियात आधी हमाली केली आहे. मी 19 व्या वर्षीच लग्न केले. त्यावेळच्या विधानपरिषद सदस्याची मुलगी पळवून लग्न केले होते. त्याच वेळी ठरवले होते की एक ना एक दिवस आमदार व्हायचे, असे लाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Prasad Lad News, Prasad Lad Life Story in Marathi
तोच झब्बा परिधान करुन मी मृत्यूनंतर जाणार आहे; रावते झाले भावूक

संघर्षातून मी विश्व निर्माण केले. मी एका गरीब कुटुंबातील असून परळच्या छोट्या खोलीत मी राहिलो आहे. कॉलेजला असताना प्रेमप्रकरणाची सुरूवात झाली. माझ्या बायकोचे वडिल बाबुराव बापसे विधान परिषदेचे सदस्य होते. त्यावेळी त्यांचा जो रूबाब होता, तो पाहूनच मी ठरवले की की एक ना एक दिवस आमदार व्हायचे.

मी वयाच्या 19 व्या वर्षीच लग्न केले. विधानपरिषद सदस्याची मुलगी पळवून लग्न केले. बापसे यांची मुलगी पळवून जाऊन लग्न करणे म्हणजे फार मोठी गोष्ट होती. तेव्हा खिशात पैसे नव्हते. मी हमालीकी करायचो, तेव्हा मला 70 रुपये मिळायचे. त्यातले 40 रुपये बायकोला द्यायचो आणि बाकी उरलेल्या पैशात माझे समाजकारण, राजकारण चालायचे. 2000 मध्ये उद्योग सुरू केला. आयुष्यात सगळ्या गोष्टी लवकर मिळाल्या. 21 व्या वर्षा मुलगी झाली.

Prasad Lad News, Prasad Lad Life Story in Marathi
एकनाथ खडसेंनी आयडिया दिली आणि सदाभाऊंचे टेन्शन हलकं झालं...

जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यामुळे सिद्धीविनायक न्यासाचा मी 31 व्या वर्षी विश्वस्त झालो. तेव्हा खूप कठीण होते. सगळ्यात लहान विश्वस्त मी होतो. संघर्षातून यशाची पायरी गाठली, अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) मला म्हाडाचा सभापती म्हणून संधी दिली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी दिली, असेही लाड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com