Narhari Zirwal News : "सर्वोच्च न्यायालयाने तपास करूनच आपल्याकडे दिलं.." ; झिरवळांचा राहुल नार्वेकरांना चिमटा !

Narhari Zirwal News : परवाही लवकर आणि सहा महिन्यानंतरही लवकर ही राजकीय भाषा..
Narhari Zirwal News :
Narhari Zirwal News :Sarkarnama

Narhari Zirwal News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. सोळा आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे दिला आहे. दरम्यान, आता याबाबत राजकीय हालचाली सुरू आहेत.

Narhari Zirwal News :
Amravati Loksabha Seat : बच्चू कडू-राणा दाम्पत्याचं राजकीय नाट्य पुन्हा सुरू; अमरावतीच्या दाव्यावरून आमने-सामने..

“सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे मला वाजवी वेळेत (reasonable time) मध्ये निर्णय घ्यायचा आहे. तो कालावधी किती दिवसांचा असेल हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. कारण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागेल , तितकाच वेळ हा वाजवी कालावधी असेल," असे नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

नार्वेकरांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रसचे नेते व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी राहुल नार्वेकरांना जोरदार टोला लगावला आहे. झिरवळ म्हणाले, "आता तपास करण्यापलीकडे मार्ग नाहीये. कितीही दिवस तपासत राहिले तरी शेवटी तपास जो ठरलेला आहे तोच करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी सांगितल्या, त्या सर्वच विरोधात आहेत. हे अध्यक्षांकडे तपासासाठी दिलेले आहे. शेवटी तपास हा तपास असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही."

Narhari Zirwal News :
New Parliament : संसद भवन उद्धघाटनापूर्वीच केजरीवाल, खर्गे अडचणीत ; राष्ट्रपतींबाबत वादग्रस्त विधान करणं भोवलं..

झिरवळ पुढे म्हणाले, "लवकरात लवकर ही एक राजकीय भाषा आहे. ती सभागृहातली भाषा आहे. लवकरात लवकर याला् केव्हीही लवकर म्हणता येतं. परवाही लवकर आणि सहा महिन्यानंतरही लवकर. अर्थात लवकरात लवकर त्यांनी तपास करायचा, निर्णय द्यायचा आहे. वास्तविक पाहता त्याच्याच तपास करण्यासारखं काही नाही. पूर्ण तपास न्यायालयाने करूनच आपल्याकडे दिला आहे. त्यांना खात्री करण्याचा अधिकार आहे, ते लवकराचत लवकर तपास करतील," असा चिमटा झिरवळांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com