Ashok Chavan|अशोक चव्हाणांसाठी हलली दिल्लीतून सुत्र; बड्या नेत्याला मिळाली जबाबदारी

Ashok Chavan| BJP-Congress|महाराष्ट्राचं राजकारण आता एका नव्या वळणावर गेले आहे.
Ashok Chavan News in Marathi, Nanded Latest Marathi News
Ashok Chavan News in Marathi, Nanded Latest Marathi Newssarkarnama

मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण आता एका नव्या वळणावर गेले आहे. कधी काय घडेल याचा काही नेम राहिला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या गुप्त भेटीच्या चर्चांनतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. असे असतानाच आता अशोक चव्हाणांसाठी थेट दिल्लीतून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया (Jyotiraditya scindia) यांनीच प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर दररोज काहीना काही घडामोडी घडत आहेत. शिवसेनेला लागलेल्या गळतीनंतर आता कॉंग्रेसमध्येही गळतीचे वारे वाहु लागले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हेदेखील पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

Ashok Chavan News in Marathi, Nanded Latest Marathi News
Maharashtra Politics| राज्यात जातीय दंगलीची शक्यता; भास्कर जाधवांचे सूचक विधान

अशोक चव्हाणांसाठी दिल्लीतून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यावर ही जबाबदारी सोपण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंनी सुरुवातीला बोलणी केल्यानंतर केंद्रातील भाजपकडून प्रयत्नांना सुरुवात झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले आणि वेगळा गट स्थापन केला. तर दूसरीकडे काँग्रेसच्या बळावर राज्यात सत्ता येणे कठीण असल्याचे अशोक चव्हाणांना जाणवू लागले होते. महाराष्ट्रातील सत्ता गेली तर किमान मंत्रिपद तरी आपल्याकडे असावे, या विचाराने त्यांनी भाजपसमोर मोर्चा वळवला.

हे कळताच केंद्रीय नेतृत्त्वाकडून ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. ज्योतिरादित्य सिंधीया यांचे वडील माधवराव आणि अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. मंत्री सिंधीया आणि अशोक चव्हाण दोन्ही नेते मुळचे काँग्रेसचेच. त्यामुळे त्यांना बोलणी करायला आणखी सोपे झाल्याचं सांगितलं जात आहे. मधल्या काळात मंत्री अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील यांनीही चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे किमान 15 आमदार त्यांच्यासोबत आणावेत, अशी भाजप वरिष्ठांची अपेक्षा असल्याची माहितीही समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in