काँग्रेस-राष्ट्रवादीचे पंधरा आमदार फुटणार? राष्ट्रपती निवडणुकीत शिंदे-फडणवीसांचा प्लॅन

एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकीत 200 आमदार मुर्मूंना मतदान करतील, असा दावा केला आहे.
NCP Latest Marathi News, Congress Latest Marathi News
NCP Latest Marathi News, Congress Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेला जोरदार झटका दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) धक्का देऊ शकतात. विधान परिषद व राज्यसभेच्या निवडणुकीत फडणवीसांनी चमत्कार घडवला होता. आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही शिंदे-फडणवीस ही जोडी काँग्रेस व राष्ट्रवादीतील 15 आमदार फोडणार, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. (CM Eknath Shinde News)

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आमदारांची 200 मतं देऊ, असं शिंदे यांनी नुकतेच जाहीर केलं आहे. शिंदे यांच्या या घोषणेमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे सरकारला बहुमत चाचणीवेळी 164 आमदारांचा पाठिंबा होता. तर आघाडीकडे 99 आमदार होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

NCP Latest Marathi News, Congress Latest Marathi News
काँग्रेसमध्ये राऊतांची पाहुणी कोण? संतोष बांगरांनी मांडली कैफियत

त्यामुळे ठाकरे यांच्याकडील 14 मतं मुर्मू यांनाच मिळणार आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडे सध्या 185 आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उर्वरित 15 मतं शिंदे व फडणवीस कुठून आणणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. विधान परिषद व राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटली होती.

आता महाविकास आघाडीतील शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमधीलच काही आमदार मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त आमदारही क्रॉस वोटिंग करतील का, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

NCP Latest Marathi News, Congress Latest Marathi News
तुम्हाला कायदा, संविधान काही तरी कळते का? शेलारांनी राऊतांना ठरवलं 'गजनी'...

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती. त्यामुळे चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला. तर बहुमत चाचणीवेळीही काँग्रेस काही आमदार अनुपस्थित होते. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही अनेक मागासवर्गातील आमदार मुर्मू यांना मतदान करणार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in