एका महिन्यात 50 भ्रष्टाचाराची पोलखोल करणार; सोमय्यांचा इशारा

मुख्यमंत्र्यासाठी माफिया आदर्श असतील पण आमच्यासाठी राम आदर्श आहेत.
Kirit Somaiya Latest News
Kirit Somaiya Latest NewsSarkarnama

विरार : भाजपचे (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज (ता.8 मे) विरार येथे कार्यकर्त्यांशी सवांद साधला. यापुढे ठाकरे सरकारच्या विरोधात रान उठवणार असून त्यांचे अनेक घोटाळे बाहेर काढणार आहे. तर एका महिन्यात ठाणे महापालिकेतील (Thane Municipal) 50 घोटाळ्याची पोलखोल करणार असल्याचा इशारा, सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) दिला. ते विरार पूर्व ठाकूबाई सभागृहात वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली होती.(Kirit Somaiya Latest News)

Kirit Somaiya Latest News
IAS पूजा सिंघल यांची आजी-माजी मुख्यमंत्र्यांवर छाप! 'ईडी'कडून सीएला अटक

कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतांना सोमय्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 28 नोव्हेंबर 2019 ला मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच करोडोंची संपत्ती जमा करायला सुरुवात केली आहे. 1 एप्रिल 2013 ते 31 एप्रिल 2013 मध्ये 19 बंगल्यांची घरपट्टी भरली. भ्रष्टाचार उघडा केला की, ठाकरे यांनी प्रवक्त्यांना शिव्या देण्याचा ठेका दिला आहे. रश्मी ठाकरे यांच्या भावाची संपत्ती जप्त केली आहे. त्याप्रमाणे कोव्हिडमधलाही घोटाळा आम्ही काढणार आहोत. उद्धव ठाकरेंच्या पत्नीचा पहिला नंबर लागला. नंतर मुलाचा नंबर लागला. आता तुमचा नंबर लागणार, असे आव्हान त्यांनी ठाकरेंना दिले.याचबरोबर एका महिन्यात ठाणे महापालिकेचा 50 भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असून, वसई-विरार पालिकेचाही भ्रष्टाचार काढणार असल्याचा इशाराही सोमय्यांनी दिला.

Kirit Somaiya Latest News
बबली मोठी झाली नाही, ती अजूनही अल्लडच!

यशवंत जाधव यांनी कोरोना काळात संपत्ती जमा केली. मानसुख हिरेनची सुपारी घेऊन हत्या केली आहे. मी पुढच्या आठवड्यात एनआयए ला भेटणार आहे प्रदीप शर्मा आणि सचिन वाझेंना उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केले होते. याबाबत उद्या सकाळी 11 वाजता मी आणि माझी पत्नी आणि मुलगा घाटकोपर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार असून 7 दिवसात गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, हनुमान चालिसा पठण करणे हा राजद्रोह आहे का? असा प्रश्न ही सोमय्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. बजरंग बली की जय म्हणणाऱ्यांना आता जेलमध्ये टाकल जात आहे. अल्पसंख्याकांच्या हिरव्यासाठी आम्हाला छेडलात तर या माफिया सरकारचे दहन केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री तुमच्यासाठी माफिया आदर्श असतील पण आमच्यासाठी राम आदर्श आहेत. हे सरकार आलिबाबा चाळीस चोर आहे. माफियावर चौकशी सुरू आहे. जो घोटाळा करतील त्याला सोडणार नाही, असा इशारा सोमय्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in