सोमय्या शिवसेनेला अडचणीत आणणार; थेट अनुसुचित जाती आयोगाकडे केली तक्रार

Kirit Somaiya| Shivsena| किरीट सोमय्यांच्या आरोपांमुळे शिवसेना-किरीट सोमय्या वादाच विकोपाला गेल्याचे दिसत आहे.
सोमय्या शिवसेनेला अडचणीत आणणार; थेट  अनुसुचित जाती आयोगाकडे केली तक्रार
Kirit Somaiya -Shivsena Crises news

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला आहे. किरीट सोमय्यांच्या दररोजच्या आरोपांमुळे शिवसेना सोमय्यांविरुद्ध चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना नेते, कार्यकर्ते माध्यमांसमोर सोमय्यांविरूद्ध आक्षेपार्ह शब्दांचा वापर करत असल्याची तक्रार आपण राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे दिल्याचे किरीट सोमय्यांनी सांगितले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Kirit Somaiya -Shivsena Crises news)

Kirit Somaiya -Shivsena Crises news
रिसॉर्ट अनिल परबांचा नाही तर त्यांनी टॅक्स का भरला?; किरीट सोमय्यांचा सवाल

किरीट सोमय्यांच्या आरोपांमुळे शिवसेना-किरीट सोमय्या वादाच विकोपाला गेल्याचे दिसत आहे. खासदार संजय राऊत पत्रकार परिषदांमधून सातत्याने सोमय्यांविरुद्ध आक्षपार्ह शब्दाचा वापर करताना दिसतात. तर सोशल मिडीयावरही सोमय्यांविरुद्ध वादग्रस्त टीका टीप्पण्या होत आहे आहेत. यावर सोमय्यांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे आता शिवसेना- किरीट सोमय्या संघर्ष ताणला गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे भविष्यात सोमय्या शिवसेनेला अडचणीत आणणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दरम्यान, आज झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. प्राप्तिकर विभागाला अनिल परब यांनी दिलेल्या जबाबातूनच ही माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनिल परब यांनी दापोलीचा रिसॉर्ट आपल्या नावावर करुन घेतला. गेल्या चार वर्षांपासून परब या रिसॉर्टचा प्रॉपर्टी टॅक्स भरत आहेत. पण अनिल परब त्यांचा या रिसॉर्टशी संबंध नसल्याचे सांगत आहेत. उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यांचे घोटाळे केले. अनिल परबही त्याच माळेतले मणी आहेत. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

दापोलीतील मुरुड गावातील साई रिसॉर्ट हा बेकादयेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. २०१९ मध्ये परब यांनी शासनाकडे साई रिसॉर्ट त्यांचाच असल्याचा अर्ज केला होता. रिसॉर्टची २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन वर्षांची घरपट्टी, मालमत्ता कर अनिल परब यांनी भरला असल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in